कुख्यात गुंड बिल्ला याचा गोळीबारात मृत्यू

कुख्यात गुंड बिल्ला याचा गोळीबारात मृत्यू

पिंपरी-चिंचवडमध्ये गोळीबार

कुर्ला येथील हलाव पूल येथे आज सकाळी गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. हलाव पूल येथे हा गोळीबार करण्यात आला असून या गोळीबारात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. कुख्यात गुंड बिल्ला उर्फ जानू पवार याच्यावर गोळीबार करण्यात आला असून त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून याप्रकरणी बिल्लाचा सावत्र भाऊ विनोद पवार याला विनोबा भावे नगर पोलिसांनी अटक केली आहे.

नेमके काय घडले?

कुख्यात गुंड जानू पवार उर्फ बिल्ला याच्यावर कुर्ला येथील विनोभा भावे नगर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. काही वर्षांपूर्वी बिल्लाने सावत्र भाऊ दीपक पवार यांची संपत्तीच्या वादातून हत्या करून त्यांचा मृतदेह खंडाळा घाट या ठिकाणी फेकला होता. या हत्येप्रकरणी बिल्ला याला अटक करण्यात आली होती. मात्र नोव्हेंबर २०१८ मध्ये बिल्ला हा जामिनावर बाहेर पडला होता. मात्र आपल्या भावाची हत्या केल्याचा राग विनोदच्या मनात होता. दरम्यान, बिल्ला नुकताच एका खुनाच्या गुन्ह्यातून जामिनावर बाहेर आला होता. याच संधीचा फायदा घेत बिल्ला याच्यावर आज गोळीबार करण्यात आला. मंगळवारी सकाळी ९.३० च्या सुमारास दुचाकीवरुन येणाऱ्या दोन व्यक्तींनी बिल्लावर गोळीबार केला. या गोळीबारात बिल्ला गंभीर जखमी झाला. त्याला जखमी अवस्थेत सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला आहे. हा गोळीबार पूर्ववैमनस्यातून झाला असावा अशी माहिती कुर्ला पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले असून बिल्लाचा सावत्र भाऊ विनोद पवार असे या संशयिताचे नाव आहे.

 

First Published on: March 5, 2019 11:40 AM
Exit mobile version