पूरपरिस्थितीत आरोग्याबाबत मार्गदर्शन करणारी ‘माहिती पुस्तिका’

पूरपरिस्थितीत आरोग्याबाबत मार्गदर्शन करणारी ‘माहिती पुस्तिका’

पूरपरिस्थितीत आरोग्याबाबत मार्गदर्शन करणारी ‘माहिती पुस्तिका’

पूरग्रस्तांच्या आरोग्यविषयक समस्यांचं निराकरण करण्यासाठी मुंबईतील जे.जे. हॉस्पिटलकडून पुढाकार घेण्यात आला असून पूरस्थितीत किंवा कोणत्याही आपात्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी माहिती पुस्तिका तयार करण्यात आली आहे. सांगली आणि कोल्हापूरमध्ये आलेल्या पूरामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालं. पूराचं पाणी ओसरल्यानंतर इथल्या लोकांचं बरंच नुकसान झालं आहे. शिवाय आरोग्यविषयक गंभीर समस्या इथे उद्भवल्या आहेत. या आणि अशा अनेक आपात्कालीन परिस्थितीवर मार्गदर्शन करण्यासाठी माहिती पुस्तिका तयार करण्यात आली आहे.

माहिती पुस्तिका

आरोग्यविषयक उद्भवणाऱ्या समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी जे.जे. हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी माहिती पुस्तिका काढण्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार, सहयोगी अधिष्ठाता आणि रोगप्रतिबंधक शास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. रंजीत माणकेश्वर यांनी ही माहिती पुस्तिका तयार केली आहे. ही पुस्तिका शासनाकडे पाठवण्यात आली आहे.

नक्की वाचा न चाललेली मुलगी १३ वर्षांनंतर राहिली स्वतःच्या पायावर उभी

पूरपरिस्थितीतील समस्यांचं व्यवस्थित निराकरण करण्यासाठी.. 

डॉ. माणकेश्वर यांच्या सांगण्यानुसार, “जे.जे हॉस्पिटलतर्फे ही माहिती पुस्तिका तयार करण्यात आली आहे. यामध्ये मेडिसीन, सर्जरी, त्वचा, कान-नाक-घसा, डोळे, बालरोगशास्त्र, रोगप्रतिबंधक शास्त्र, औषधशास्त्र, विकृतीशास्त्र, मनोविकार या विभागांच्या तज्ज्ञांकडून अभ्यास करून ही पुस्तिका तयार करण्यात आली आहे. पूर ओसरल्यानंतर आरोग्यविषयक अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे अशा परिस्थितीत या समस्यांचं व्यवस्थित निराकरण करण्यासाठी ही पुस्तिका तयार करण्यात आली आहे.”

पूरग्रस्तांच्या विविध समस्यांचं वर्गीकरण होणं याशिवाय…

डॉ. माणकेश्वर यांनी सांगितलं की, “पूरग्रस्तांच्या विविध समस्यांचं वर्गीकरण होणं याशिवाय लहान मुलं, वृद्ध व्यक्ती, गरोदर महिला यांची कशाप्रकारे काळजी घ्यावी याबाबत माहिती देण्यात आली आहे. पूरामुळे उद्भवणाऱ्या अनेक समस्यांना कशा पद्धतीने प्रतिबंध करता येईल याची देखील माहिती देण्यात आली आहे.”

पूरग्रस्तांचं मनोबल खचलं असेल तर त्याकडेही लक्ष देणं गरजेचं

पूरानंतर अनेक संसर्गजन्य आजारांसोबत पूरग्रस्तांचं मनोबल खचलं असेल तर त्याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे हे जाणून याबाबत देखील पुस्तकात मुद्दे मांडण्यात आले आहेत. ही पुस्तिका संचालनालय, वैद्यकीय शिक्षण आणि औषध द्रव्ये विभागाकडे सुपूर्द करण्यात आली आहे.


हेही वाचाटी.बी. रुग्णालयात इस्कॉनला नियमबाह्य कंत्राट, स्थायी समितीने प्रस्ताव फेटाळला


 

First Published on: August 21, 2019 10:20 PM
Exit mobile version