मुंबईत लवकरच घरपोच ऑक्सिजन सिलेंडरची सुविधा

मुंबईत लवकरच घरपोच ऑक्सिजन सिलेंडरची सुविधा

मुंबईत लवकरच घरपोच ऑक्सिजन सिलेंडरची सुविधा

मुंबईत कोरोना रुग्णसंख्या मोठ्याप्रमाणात वाढत असून अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे गंभीर कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करण्यात अनेक अडचणी निर्माण होत आहेत. यापार्श्वभूमीवर आता गरज पडल्यास रुग्णाला घरपोच ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य सरकार आणि महापालिका प्रयत्न करत आहे. याबाबत अद्याप राज्य सरकार आणि महापालिकेमध्ये चर्चा सुरु असून अंतिम निर्णय अद्याप बाकी आहे. या निर्णयावर सकारात्मक चर्चा झाल्यास मुंबईतील अनेक कोरोनाबाधित रुग्णांना लवकरच घरपोच ऑक्सिजन सिलेंडरची सुविधा मिळणार आहे.

दरम्यान महिंद्रा ग्रुपने ऑक्सिजन सिलेंडर्स रूग्णालयातून ने- आण करण्यासाठी १०० वाहने पालिकेच्या आरोग्य सेवेत दाखल केली आहेत. दरम्यान रुग्णांना घरपोच ऑक्सिजन सिलेंडर देण्यासंदर्भात पालिकेने मार्गदर्शक सुचना जाहीर केल्यास महिंद्रा ग्रुप आपल्या वाहनांचा ताफा वाढण्याची योजना आखत आहेत.

सद्यस्थितीत महिंद्रा समूहाने ऑक्सिजन उत्पादकांसह चर्चा करत ऑक्सिजनची अत्यंत गरज असणाऱ्या रूग्णालये आणि वैद्यकीय केंद्रांना ऑक्सिजन साठा पोहचवण्यासाठी ‘ऑक्सिजन ऑन व्हील्स’ ही विनामूल्य वाहतूक सेवा सुरू केला. या उपक्रमाची सुरुवात मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, चाकण, नाशिक आणि नागपूर येथे करण्यात आली असून यामध्ये १०० हून अधिक वाहने दररोज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ऑक्सिजन साठा घेऊन जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा गंभीर परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य सरकार कॉर्पोरेट्स आणि अनेक मोठ्या खासगी कंपन्यांची मदत घेत आहे.

महिंद्रा ग्रुपच्या सूत्रांचा माहितीनुसार, गेल्या ४८ तासांमध्ये ‘ऑक्सिजन ऑन व्हील्स’ उपक्रमाला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादामुळे आता थेट रुग्णाचा घरी ऑक्सिजन सिलेंडर देण्यासाठी या उपक्रमाचा विस्तार वाढण्याचा विचार सुरु आहे. कोरोनाचा नायनाट करण्यासाठी वाहनांचा मोठा ताफा पालिकेचा सेवेत दाखल होणार आहे. तसेच महिंद्रा लॉजिस्टिक्स रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी ऑक्सिजन पुरवठा करणारी अंखडित साखळी तयार करत अनेक रुग्णालय व वैद्यकीय केंद्रांपर्यंत ऑक्सिजन पोहचवण्याचे काम करीत आहे.

सध्या देशभरातील अनेक कोव्हिड रुग्णालयांमध्ये मोठ्याप्रमाणात लागणाऱ्या लिक्विड ऑक्सिजनची वाहतूक करणे मोठी अडचण ठरत आहे. लिक्विड ऑक्सिजन उत्पादित ठिकाणाहून रुग्णालये आणि नर्सिंग होमपर्यंत पोहचवण्यासाठी टँकरची संख्या अपुरी पडत आहे. कारण लिक्विड ऑक्सिजन उत्पादन मोठ्याप्रमाणात होत असले तरी ते उत्पादित ठिकाणीहून रुग्णालयापर्यंत पोहवण्यासाठी टँकर उपलब्ध नाहीत. परिणामी ऑक्सिजन असूनही ते वेळेत रुग्णपर्यंत पोहचणे अवघड झाले आहे. यामुळे कोरोनाबाधित रुग्णांनी आणि आरोग्य व्यवस्थेने यापरिस्थितीसमोर गुडघे टेकले आहेत.

अनेक रुग्णांचे नातेवाईक आता ऑक्सिजन सिलेंडर्स नव्हे तर ऑक्सिजन काँन्सट्रेटर्सही खरेदी करत आहे. त्यामुळे या आठवड्याच्या सुरुवातीस इतर देशांकडून अनेक ऑक्सिजन काँन्सट्रेटर्स मशीन आयात करण्यात आल्या. होम क्वारंटाइन रुग्णांकडून सध्या ऑक्सिजन काँन्सट्रेटर्स मशीनची मोठी मागणी आहे. ही मशीनच्या माध्यमातून हवेतील ऑक्सिजन शोषण घेत शुद्ध करुन ते रुग्णांना दिले जाते. विशेषत: जे घरी होम क्वारंटाइन असून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असेल त्यांचासाठी हे ऑक्सिजन काँन्सट्रेटर्स मशीन फार उपयुक्त ठरत आहे.


Covid-19 लस घेतल्यानंतर किती दिवसात रक्तदान करता येईल? जाणून घ्या


 

First Published on: May 6, 2021 11:08 AM
Exit mobile version