CoronaVirus: मुंबईकरांसाठी महिंद्रा आणि उबेरची मोफत टॅक्सी सेवा

CoronaVirus: मुंबईकरांसाठी महिंद्रा आणि उबेरची मोफत टॅक्सी सेवा

CoronaVirus: मुंबईकरांसाठी महिंद्रा आणि उबेरची मोफत टॅक्सी सेवा

कोरोना विषाणू जगभरात धुमाकूळ घालत असून देशभर लॉकडाऊन सुरू आहे. यात रेल्वे सेवासह सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद आहे. त्यामुळे मुंबईतील गरोदर स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग नागरिक अनेक समस्यांना सामोरे जात आहेत. त्यांना तात्काळ टॅक्सी सेवा मिळावी म्हणून महिंद्रा लॉजिस्टिक लिमिटेड आणि उबेर या ऍग्रीगेटर कंपनीने पुढाकार घेतला आहे. महिंद्राने मुंबई पोलिसांसह, तर उबेरने मुंबई वाहतूक पोलिसांच्या मदतीने मंगळवारी मोफत टॅक्सी सेवेचा शुभारंभ केला.
संपूर्ण विश्वात हाहाकार माजविणाऱ्या कोरोना विषाणूची दहशत मुंबईतही निर्माण झाली आहे. देशाची आर्थिक राजधानी आता दिवसेंदिवस कोरोना विषाणूची केंद्र बनत चालली आहेत. लॉकडाऊन लोकल सेवासह सर्वच बंद आहेत. त्यामुळे मुंबईतील गरोदर स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग नागरिकांना हॉस्पिटलमध्ये जाण्याकरिता अनेक समस्या होत आहेत. म्हणून त्यांच्या मदतीसाठी महिंद्रा लॉजिस्टिक लिमिटेड आणि उबेर या ऍग्रीगेटर कंपनीने पुढाकार घेतला आहे. महिंद्राच्या अलाईटतर्फे हैद्राबादमध्ये सुरू केलेला हा उपक्रम मंगळवारी मुंबईतही सुरू करण्यात आला. वांद्रे ते दहिसर या भागात ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्री आणि इतर दिव्यांग नागरिकांना या उपक्रमात मोफत टॅक्सी सेवा देण्यात येईल. यामध्ये संबंधित नागरिकांना जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी, बँक आणि पोस्टातील कामासाठी, रुग्णालयात जाण्यासाठी मोफत टॅक्सी सेवा पुरवण्यात येणार आहे.

२४ तास मिळणार टॅक्सी सेवा

कोरोनाविरोधात लढणाऱ्या डॉक्टर्स आणि नर्सेसनाही या सेवेचा लाभ घेता येईल. महत्त्वाची बाब म्हणजे लॉकडाऊनच्या काळात २४ तास ही सेवा कार्यरत असेल, असेही महिंद्रातील समन्वयकाने स्पष्ट केले. मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाच्या मदतीने मुंबईकरांना मोफत टॅक्सी सेवा पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

उबेर देणार फक्तही सेवा

उबेरच्या अॅपवर फक्त उबेर इसेंशिअल या सेवेमध्ये मोफत टॅक्सी सेवा मिळेल. महत्त्वाची बाब म्हणजे उबेरतर्फे फक्त रुग्णालयांत जाण्यासाठीच मोफत टॅक्सी सेवा देण्यात येणार आहे. मुंबईत या सेवेचा शुभारंभ केलेला असून लवकरच इतर ठिकाणीही सेवा सुरू करणार असल्याचे उबेरने स्पष्ट केले.


हेही वाचा – CoronaVirus: लॉकडाऊनमुळे कुटुंबाने केली आत्महत्या!, घ्या सत्य जाणून


First Published on: April 14, 2020 9:07 PM
Exit mobile version