Live: ‘पुढच्या वर्षी लवकर या!’; आभाळ भरलं होतं तू येताना, डोळे भरून आले तू जाताना!

Live: ‘पुढच्या वर्षी लवकर या!’; आभाळ भरलं होतं तू येताना, डोळे भरून आले तू जाताना!
मुंबई तसेच पुणे, नाशिक राज्यभरात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सकाळपासूनच वाजत-गाजत निरोप द्यायला सुरूवात झाली आहे. मुंबई तसेच पुण्यात गणेश भक्तांसह ढोल-पथकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत असून एकच लगबग दिसून येत आहे. दहा दिवस लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत कोणताही गैरव्यवहार, गैरप्रकार घडू नये, बाप्पाचे विसर्जन निर्विघ्नपणे व्हावे, यासाठी पोलीस प्रशासनासह मुंबई महानगरपालिकाही सज्ज झाली आहे.
A view of the sea

पाहा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरातील गणरायाचं पर्यावरणपूरक विसर्जन

गणेशगल्लीचा गणपती गिरगाव चौपाटीवर दाखल… थोड्याच वेळात बाप्पाचं विसर्जन…

पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींचं विसर्जन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा येथील निवासस्थानावरील गणपतीचं पर्यावरण पूरक पद्धतीनं विसर्जन पार पडलं…

पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचं ढोल ताशांच्या गजरात विसर्जन…

First Published on: September 12, 2019 11:32 AM
Exit mobile version