‘सरकारने मदत द्यावी’, मृताच्या नातेवाईकांची मागणी

‘सरकारने मदत द्यावी’, मृताच्या नातेवाईकांची मागणी

घाटकोपरमध्ये कोसळलेले चार्टर्ड विमान

गुरुवारी दुपारी घाटकोपर पश्चिमेच्या सर्वोदय हॉस्पिटलच्या परीसरात विमान कोसळलं आणि या घटनेत एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला. कोणतीही चूक नसताना या दुर्घटनेत गोविंद दुबे यांचा मृत्यू झाला. गोविंद यांच्या अचानक मृत्यूमुळे दुबे कुटुंब वाऱ्यावर पडलं असून त्यांच्या कुटुंबियांनी सरकारकडून त्वरीत मदतीची मागणी केली आहे.

मृत गोविंद दुबे

जेट फ्युएलमुळे मृत्यू

विमानाने जुहूवरुन १वाजता उड्डाण केले आणि अवघ्या १० मिनिटात हे विमान कोसळले. हे विमान घाटकोपरच्या जीवदया लेन परीसरात पडले. हे विमान जेथे पडले तेथून गोविंद दुबे जात होते. ते एका साईटवर कारपेंटर म्हणून कामाला होते. दुपारी कामावरुन घरी जाताना ही दुर्घटना घडली. त्यांच्या अंगावर जेट फ्युएल पडले आणि त्यात त्याचा होरपळून मृत्यू झाला.

वाचामृत पायलट मारियाच्या पतीचे यु वाय कंपनीवर गंभीर आरोप

मृतदेहाची ओळख पटण्यास अडचणी

दुर्घटनेमध्ये विमानातील चौघांचा मृत्यू झाला. तर एक पादचारी माणसाचा मृत्यू झाला असे समोर येत होते. पण मृतदेह जळाल्यामुळे त्याची ओळख पटण्यास अडचणी येत होत्या. घटनेनंतर कुटुंबियांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण फोन बंद होता. त्यानंतर घरातल्यांना या घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय आला.  मृतदेहाच्या नाकाच्या आकारावरुन गोविंद दुबे यांच्या कुटुंबियांना त्यांंच्या मृतदेहाची ओळख पटली.

कोणतीही चूक नसताना आमच्या कुटुंबातील माणसाचा जीव गेला आहे. घराचा आधार गेला.त्यामुळे आम्हाला स

गोपाळ दुबे, गोविंदचा भाऊ

रकारने आणि वाय यू एशियन कंपनीने मदत द्यावी
– गोपाळ दुबे.

 

 प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

विमानाच्या पायलट मारिया यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. विमानात असणाऱ्या सर्व जणांनि अनेकांचे प्राण वाचवण्यासाठी स्वत:चा जीव गमावला. विमान बांधकाम सुरु असलेल्या इमारतीजवळ पडल्याने मोठा अनर्थ टळला. गजबजलेल्या भागात जर विमान कोसळले असते तर मोठी जीवितहानी झाली असती.

वाचा-दुर्घटनाग्रस्त विमानाच्या दुरुस्तीवर संशय

सकाळी विमानाची पूजा आणि दुपारी अपघात

दुर्घटनाग्रस्त विमानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. दुरुस्तीनंतर गुरुवारी या विमानाची ट्रायल रन होती. त्यामुळे सकाळी नारळ फोडून या विमानाची पुजा करण्यात आली. मिठाई सुध्दा वाटण्यात आली होती. विमान उड्डान झाल्यानंतर काही मिनिटातच हे विमान घाटकोपर भागामध्ये कोसळले. या दुर्घटनेमध्ये विमानातील पायलट मार्या झुबेर, कोपायलट प्रदीप राजपुत, इंजिनिअर सुरभी गुप्ता आणि इंजिनिअर मनिष पांडे यांना जीव गमवावा लागला.

 

First Published on: June 29, 2018 2:40 PM
Exit mobile version