दिव्यांग कुटूंबियांची केडीएमसीकडून थट्टा !

दिव्यांग कुटूंबियांची केडीएमसीकडून थट्टा !

शंकर साळवी

दिव्यांग कुटूंबियांचे अधिकृत दूध विक्री केंद्राच्या स्टॉलवर केडीएमसीने हातोडा मारल्याने कल्याणातील साळवे कुटूंबिय मागील दोन वर्षापासून पुर्नवसनासाठी पालिकेच्या दरबारी चपला झिजवत आहेत. अखेर पालिकेने त्यांना गाळा देण्याचे लेखी आश्वासन दिले. मात्र पालिकेने बांधलेला गाळा तांत्रिकदृष्टया योग्य नसल्याने गाळ्यात जाणे अवघड असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

त्यामुळे पालिकेकडून दिव्यांग कुटूंबियांची थट्टा चालवली जात असल्याचा आरोप अपंग शंकर साळवे यांनी केला आहे. दोन वर्षापासून रोजगाराचे साधन नसल्याने साळवे कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. कल्याण जवळील मोहोने परिसरात शंकर साळवे हे पत्नी आणि मुलीसह राहतात. साळवे दाम्पत्याचे कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात आरे सरीता नावाचे दूध केंद्र होते. तेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन होते. दोन वर्षापूर्वी पालिका प्रशासनाने इथल्या अनधिकृत टपर्‍यांवर कारवाई करताना त्यांच्या दूध विक्री केंद्राच्या स्टॉलही हातोडा मारला होता. गेल्या दोन वर्षापासून साळवे हे पुर्नवसनासाठी आंदोलन आणि उपोषणाच्या माध्यमातून पालिकेशी लढा देत आहेत.

राज्य शासनानेही साळवे यांना दूध विक्री केंद्रासाठी नियमानुसार पर्यायी जागा देण्याबाबत पालिकेला पत्र दिले होते. मात्र याबाबत कोणतीही कार्यवाही होत नसल्याने साळवे यांनी २० नाव्हेंबर २०१७ रोजी आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानंतर पालिकेने पुर्नवसनासाठी गाळा देण्याची कार्यवाही सुरूअसल्याचे लेखी आश्वासन त्यांना दिले होते. पालिका प्रशासनाच्या उत्तरानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले होते. मात्र त्यानंतर १५ डिसेंबर २०१७ च्या महासभेत जागा देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. मात्र सहा महिने होऊनही अजून साळवे यांचे पुर्नवसन झालेले नाही.

First Published on: July 24, 2018 5:04 PM
Exit mobile version