अर्धांगवायूने पिडीत रुग्णांना तात्काळ आणि मोफत उपचार द्या; नगरसेवक सचिन पडवळांची आयुक्तांकडे मागणी

अर्धांगवायूने पिडीत रुग्णांना तात्काळ आणि मोफत उपचार द्या; नगरसेवक सचिन पडवळांची आयुक्तांकडे मागणी

अर्धांगवायूने पिडीत रुग्णांना तात्काळ आणि मोफत उपचार द्या; नगरसेवक सचिन पडवळांची आयुक्तांकडे मागणी

अर्धांगवायूचा झटका आलेल्या आर्थिक दुर्बल रुग्णांना पालिका रुग्णालयात तातडीने आणि मोफत उपचार देण्यात यावेत. त्यामुळे त्यांचे अवयव कायमस्वरूपी अधू होण्याची शक्यता कमी असते. तसेच, वेळेत उपचार मिळाल्याने लवकरात लवकर बरे होऊन आपल्या नातेवाईकांसोबत आपली दिनचर्या आनंदात व्यतीत करू शकतील, अशी मागणी शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांनी पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्याकडे केली आहे.

एखाद्या चांगल्या सुदृढ व्यक्तीला अचानकपणे अर्धांगवायूचा झटका आल्यास त्याला तातडीने म्हणजे अवघ्या साडेचार तासांत रुग्णालयीन उपचार मिळाल्यास तर त्या व्यक्तीचे अवयव कायमस्वरूपी अधू होण्यापासून वाचवता येऊ शकतात आणि ती व्यक्ती पुर्णपणे बरे होऊन पूर्वीसारखीच कार्यतत्पर होण्यास, सुदृढ होण्यास चांगलीच मदत होते. मात्र अनेकदा आर्थिक दुर्बल घटकातील व्यक्तींना जर अर्धांगवायूचा झटका आल्यास त्याला नजीकच्या रुग्णालयात तातडीने आणि मोफत उपचार त्वरित मिळण्यात नेहमीच अडचण येत असते. हा आजपर्यंतचा अनुभव असून अशा घटना वारंवार घडताना आढळून येते. ही गंभीर बाब लक्षात घेऊन शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांनी, आर्थिक दुर्बल घटकातील व्यक्तींना जर अर्धांगवायूचा झटका आल्यास त्यांच्या शरीराचे अवयव अधू होण्यापूर्वीच त्यांना पालिकेच्या रुग्णालयात तातडीने व मोफत उपचार देण्यात यावेत. अशा रुग्णांना अर्धांगवायूचा झटका आल्यास लागेच तब्बल ५० हजार रुपये किमतीचे ‘आरटीपीए’ हे इंजेक्शन देणे फार गरजेचे असते. ते त्यांना पालिका रुग्णालयात आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याने तातडीने आणि मोफत देण्यात यावेत, अशी मागणी सचिन पडवळ यांनी केली आहे.

या मागणीचा ठराव पालिका सभागृहात एकमताने अथवा बहुमताने मंजूर झाल्यास आणि यावर तातडीने अंमलबजावणी केल्यास दिव्यांग व्यक्तींना खूप मोलाची मदत होणार अडून मोठा दिलासा मिळणार आहे.


हेही वाचा – पेंग्विनच्या देखभालीसाठी जुन्याच कंत्राटदाराला मुदतवाढ


 

First Published on: November 15, 2021 9:33 PM
Exit mobile version