घरताज्या घडामोडीपेंग्विनच्या देखभालीसाठी जुन्याच कंत्राटदाराला मुदतवाढ

पेंग्विनच्या देखभालीसाठी जुन्याच कंत्राटदाराला मुदतवाढ

Subscribe

भायखळा राणी बागेतील पेंग्विन कक्षातील पेंग्विन, त्यांचे पिल्लू आणि एकूणच पेंग्विन कक्षाची देखभाल आदींसाठी नेमलेल्या मे.हायवे कन्स्ट्रक्शन या कंत्राटदाराला ३ वर्षांसाठी ११.४६ कोटी रुपयांचे दिलेल्या कंत्राटाची मुदत ३० सप्टेंबर २०२१ रोजी संपुष्टात आली आहे. मात्र नवीन कंत्राटदार नियुक्तीसाठी ३-३ वेळा टेंडर काढूनही त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. यास्तव, पालिकेने जुन्याच कंत्राटदाराला ४३ दिवसांसाठी मुदतवाढ दिली असून त्यास त्यासाठी ४५.८४ लाख रुपयांचा मोबदला दिला जाणार आहे.

यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे. या प्रस्तावाला पहारेकरी भाजप आणि विरोधी पक्ष यांच्याकडून कदाचित विरोध होण्याची शक्यता पालिका वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

मुंबई महापालिकेने मनोरंजनाचे एक साधन म्हणून कोट्यवधी रुपये खर्चून विदेशातून हंबोल्ट पेंग्विन पक्षी मुंबईतील राणी बागेत आणले. त्यांच्यासाठी अद्यावत पेंग्विन कक्ष १८ मार्च २०१७ पासून सुरू करण्यात आला होता. या पेंग्विनची व कक्षाची विशेष देखभाल करण्यासाठी पालिकेने मे.हायवे कन्स्ट्रक्शन या कंत्राटदाराला ३ वर्षांसाठी ११.४६ कोटी रुपयांचे कंत्राट दिले होते. त्याची मुदत ३० सप्टेंबर २०२१ रोजी संपुष्टात आली आहे. त्यामुळे पुढे कंत्राटदार नेमण्यासाठी पालिकेने तीन वेळा टेंडर काढले. तिन्ही वेळा एक, दोन कंत्राटदारांनीच प्रतिसाद दिला. त्यात जुनाच कंत्राटदार कंत्राटं मिळविण्यासाठी जास्त आतुर असल्याचे व अपेक्षित दुसरा चांगला प्रतिसाद मिळण्यात अडचण दिसून आली. त्यामुळे पालिकेने नवीन कंत्राट करार होईपर्यंत जुन्याच कंत्राटदाराला पुढील ४३ दिवसासाठी कंत्राटकाम दिले. त्यासाठी त्याला ४५ लाख ८४ हजार रुपयांचा मोबदला दिला आहे. आता पुन्हा पुढील तीन वर्षांसाठी याच कंत्राटदाराला कंत्राटं मिळण्याची दाट शक्यता आहे.


हेही वाचा – विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन एक आठवडा पुढे ढकलण्याची राजकीय पक्षांची मागणी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -