महानगरचा दणका; हनुमान गल्लीतील वेश्याव्यवसाय बंद!

महानगरचा दणका; हनुमान गल्लीतील वेश्याव्यवसाय बंद!

मुंबईतल्या लोअर परळ परिसरातील हनुमान गल्लीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून चालणाऱ्या वेश्या व्यवसायामुळे स्थानिक हैराण झाले होते. यासंदर्भातील बातमी आपलं महानगर या वर्तमान पत्रात छापून आली होती. आपलं महानगरच्या याच बातमीची दखल घेत ना.जोशी मार्ग पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक पंडित थोरात यांनी घेतली असून, या परिसरात धडक कारवाई सुरू केली आहे. विशेष म्हणजे आपलं महानगरच्या बातमीनंतर पोलिसांनी सुरू केलेल्या धडक कारवाईमुळे सध्या तरी हा व्यवसाय बंद झाल्याचे चित्र दिसत आहे. मुंबईतील लोअर परेल परिसरातील हनुमान गल्ली या भागात गेल्या ४० वर्षांपासून अनधिकृतपणे वेश्याव्यवसाय सुरू होता. मात्र, मागील एका वर्षांपासून इथून जाणारे स्थानिक एका भीतीच्या दडपणााखालून वावरत होते. आता या ठिकाणाहून जाणार्‍यांना पादचार्‍यंना पकडून त्यांच्याकडून पैसे, दागिने लुटले जात होते. या प्रकारामुळे आता या भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या भागात वेश्या व्यवसाय करणार्‍या महिला या सर्वाधिक बांगलादेशी आहेत. गेल्या ४० वर्षापासून या भागात परप्रांतिय महिला वेश्या व्यवसाय करत असून,सुरुवातीच्या काळात या परिसरात अनेक महिला हा व्यवसाय करत होत्या.

मनसेने मानले आपलं महानगरचे आभार

आपलं महानगरने छापलेल्या बातमीमुळे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याला यश मिळाल्याची प्रतिक्रिया, मनसेचे शाखा अध्यक्ष मंगेश कसालीकर यांनी दिले. तर इथल्या रहिवाशांनीदेखील आपलं महानगर आणि मनसेच्या पुढाकारामुळे आम्हाला न्याय मिळाल्याची भावना आपलं महानगरकडे व्यक्त केली. याविषयीची सविस्तर बातमी आपलं महानगरने छापल्यानंतर पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आणि कारवाई करायला सुरूवात केली. विशेष म्हणजे याच हनुमान गल्लीला लागून 2017 साली सुसज्ज आणि सुंदर असे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उद्यान बांधण्यात आले. मात्र याच उद्यानाला लागून असलेल्या गल्लीमध्ये हा व्यवसाय सुरु असल्यामुळे या उद्यानाकडे देखील रहिवांशांनी पाठ फिरवली आहे. दरम्यान, हनुमान गल्लीमध्ये चालणार्‍या या व्यवसायाबद्दल मनसेचे शाखा अध्यक्ष मंगेश कसालकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना.म.जोशी मार्गचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना पत्र लिहून इथे चालणारा व्यवसाय कायम स्वरुपी बंद करावा, अशी मागणी केली होती. आता मात्र, इथला वेश्या व्यवसाय पूर्णपणे बंद करण्यात आल्याचे फलकही मनसेने लावले आहेत.

First Published on: November 21, 2018 7:13 PM
Exit mobile version