पाकिस्तानपेक्षाही भारताची परिस्थिती वाईट हे कटू सत्य; ‘सामना’तून सरकारवर टीका

पाकिस्तानपेक्षाही भारताची परिस्थिती वाईट हे कटू सत्य; ‘सामना’तून सरकारवर टीका

जागतिक भूक सूचकांक म्हणजे ‘ग्लोबल हंगर इंडेक्स’ मध्ये भारताचे स्थान खाली घसरले. वाढत्या उपासमारीच्या संकटासाठी देशातील आतापर्यंतची सर्वच सरकार यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करावे लागेल असे म्हणत भारतात पाकिस्तानपेक्षाही उपासमारी वाढली असून हे कटू सत्य नाकारता येणार नाही, अशा शब्दात सामनातून शिवसेनेने देशातील या परिस्थितीला सर्व सरकार जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

जागतिक भूक सूचकांक म्हणजे ‘ग्लोबल हंगर इंडेक्स’ मध्ये ११७ देशांच्या यादीत भारताची १०२व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. या यादीत भारत पाकिस्तानपेक्षा पिछाडीवर पडला आहे. मागील वेळी या यादीत पाकिस्तान सर्वात शेवटच्या क्रमांकावर होता. पण यंदा त्यांच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. यंदा या यादीत पाकिस्तानने ९४ क्रमांकावर स्थान मिळवले आहे. यंदा या यादीत भारताची घसरगुंडी झाली असून मागील यादीत ९४ क्रमांकावर असणारा भारत यंदा १०२ व्या क्रमांकावर फेकला गेला.

उपासमारीच्या प्रश्नाचा गांभिर्याने विचार करावा

इतर राष्ट्रीय प्रश्नांप्रमाणेच उपासमारीचा प्रश्नाचाही सर्वांनी विचार करणे गरजेचे आहे. उपासमारीच्या आव्हानाचा सरकारला गांभीर्याने विचार करावा लागेल. तसेच ही जबाबदारी सरकारप्रमाणेच समाजाचीसुद्धा आहे, असेही ‘सामना’त म्हटले आहे.

First Published on: October 17, 2019 10:57 AM
Exit mobile version