भारत जोडो यात्रेत सहभागी व्हा, संजय राऊतांचे मोदी-शाहांना आवाहन

भारत जोडो यात्रेत सहभागी व्हा, संजय राऊतांचे मोदी-शाहांना आवाहन

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची तब्बल 103 दिवसांनी बुधवारी रात्री कारागृहातून सुटका झाली. त्यांनतर संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्या नंतर राऊतांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची सुद्धा भेट घेतली. शिवसेना खासदार संजय राऊत हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सुद्धा भेट घेणार आहेत असं म्हटलं जात आहे.

याच संदर्भात संजय राऊत म्हणले, लोक कल्याणासाठी मी या नेत्यांची भेट घेणार आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतुत्वात सुरु असलेल्या भारत जोडो यात्रेसंदर्भात सुद्धा संजय राऊत यांनी मोठे विधान केले.

संजय राऊत (sanjay raut) म्हणाले, काँग्रेसची भारत जोडो यात्रा (bharat jodo yatra) देशातील कटुता संपविण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. ही एक चळवळ आहे. देशातील कटुता या यात्रेने संपेल त्यामुळेच भाजपने देखील या भारत जोडो यात्रेला पाठिंबा द्यायला हवा, असं आवाहन संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी (pm narendra modi) आणि अमित शहा (amit shaha) यांच्या भेटीआधी केले आहे. याशिवाय काँग्रेसची भारत जोडो यात्रा ही भाजपच्या विरोधात नसून लोकांना एकत्र आणण्यासाठी आहे असंही संजय राऊत म्हणाले.

तत्पूर्वी राऊत यांनी कारागृहातून सुटल्यानंतर आपल्याला कारागृहात टाकण्याची देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी चूक आहे असे म्हटलं होले. त्यामुळे संजय राऊत हे त्यांच्या खास शैलीत भाजपवर जोरदार हल्लाबोल करणार हे निश्चितच होते. पण संजय राऊत यांची भाषा मवाळ झाल्याचे दिसता आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 2024 च्या निवडणूका डोळ्यांसमोर ठेऊन राहुल गांधी (rahul gandhi) देशभरात भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून पक्षबांधणी करत आहेत.


हे ही वाचा – संजय राऊत लवकरच नाशिक दौर्‍यावर; स्थानिक पदाधिकार्‍यांच्या भेटीत आश्वासन

First Published on: November 11, 2022 10:28 AM
Exit mobile version