घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसंजय राऊत लवकरच नाशिक दौर्‍यावर; स्थानिक पदाधिकार्‍यांच्या भेटीत आश्वासन

संजय राऊत लवकरच नाशिक दौर्‍यावर; स्थानिक पदाधिकार्‍यांच्या भेटीत आश्वासन

Subscribe

नाशिक : ईडीच्या कारवाईत जामिन मिळाल्यानंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत राजकारणात सक्रीय झाले आहेत. लवकरच नाशिक जिल्हा दौर्‍यावर येण्याचे आश्वासन त्यांनी नाशिकच्या पदाधिकार्‍यांना दिले आहे. नाशिकच्या सेना पदाधिकार्‍यांनी गुरुवारी (दि.10) संजय राऊत यांची मुंबईत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी माजी आमदार वसंत गिते, माजी महापौर विनायक पांडे, ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड, उपनेते सुनील बागूल राजेंद्र देसाई आदी उपस्थित होते.

यावेळी खासदार राऊत म्हणाले, शिवसेनेच्या विरोधकांनी कितीही प्रयत्न केले, मार्गात अडथळे आणले तरी शिवसेना आपल्या मार्गाने खंबीरपणे चालत राहणार आहोत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात लवकरच पक्षाला अधिक चांगले दिवस येतील, याबाबत मला काहीही शंका नाही. नाशिकचे नेते त्यांना म्हणाले की, बंडखोर गट तसेच फुटीचे कारस्थान करणारी मंडळी आजही दिवसरात्र लहान लहान कार्यकर्त्यांची दिशाभूल करून त्यांना ओढण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र त्यात ते यशस्वी होणार नाही. नाशिकमध्ये शिवसेना भक्कम राहिल्याने विरोधकांचीच झोप उडाली आहे, असे नाशिकच्या नेत्यांनी त्यांना सांगितले.

- Advertisement -

यावेळी खासदार राऊत म्हणाले, यापुढे अधिक जागरूक व आक्रमकपणे सर्वांनी एकोप्याने काम करावे लागेल. मी लवकरच पक्षाच्या संघटनात्मक वाढीसाठी दौरा करणार आहे. सर्वात आधी नाशिकला येण्याचा माझा प्रयत्न असेल. या दौर्‍यात महापालिकेसह आगामी सर्व निवडणुकांना सामोरे जाण्याचे नियोजन करू. शिवसेनेविरोधात झालेल्या राजकीय षडयंत्रातून उद्धव ठाकरे यांना पायउतार व्हावे लागले. सध्या तर जे सत्तेत आहे, ती मंडळी सतत शिवसेनेच्या विरोधात कारस्थाने करीत आहे. हे लोकांना पसंत पडलेले नाही. त्यामुळे लोकभावना शिवसेनेबरोबर आहे. मुंबई येथील राऊत यांच्या निवासस्थानी शिवसेना नेत्यांनी गुलाबाच्या फुलांचा मोठा हार देऊन त्यांचे स्वागत केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -