Kala Ghoda Festival 2021: यंदा घरबसल्या काळाघोडा महोत्सव साजरा करा

Kala Ghoda Festival 2021: यंदा घरबसल्या काळाघोडा महोत्सव साजरा करा

Kala Ghoda Festival 2021: यंदा घरबसल्या काळाघोडा महोत्सव साजरा करा

मुंबईकरांना फेब्रुवारी महिना आला की, त्यांना वेध लागतात काळाघोडा महोत्सवाचे. दरवर्षीप्रमाणे यंदाही काळाघोडा महोत्सव साजरा होणार आहे. कोरोना काळ असला तरीही त्याच जोशात काळाघोडा महोत्सव साजरा केला जाणार आहे. आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा महोत्सव यंदा डिजिटल प्लॅटफॉर्म आयोजित करण्यात आला आहे.

यंदा काळाघोडा असोसिएशन (KGA)द्वारे आयोजित होणाऱ्या या कार्यक्रमात ७० वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. www.kgaf2021.com द्वारे हे इनसाइडर काळाघोडा महोत्सव होस्ट करेल. जगभरातील लोक ६ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारीपर्यंत काळाघोडा महोत्सवाचा आनंद लुटू शकतील. एवढेच नाही तर पहिल्यांदाच कला संबंधित सर्व स्टॉल्स ऑनलाईन सुरू करण्यात येणार आहेत. महोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून लोक ई-स्टॉल्सच्या माध्यमातून उत्कृष्ट गुणवत्तेच्या वस्तू आणि इतर उत्पादने महिन्याच्या अखेरपर्यंत www.kgaf2021.comवर पाहू शकतात. कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार आहे.

महोत्सवाचे स्वरुप

काळाघोडा महोत्सवात नेहमीप्रमाणे नृत्य आण संगीत यावर आधारित परिसंवाद, कार्यशाळा सादरीकरण होईल. तसेच नऊ दिवस संगीत, दृश्यकला, थिएटर, सिनेमा, साहित्य, पुस्तक प्रकाशन आणि दिग्गजांचा मानवंदना असा कार्यक्रम होईल. शिवाय मुंबईतील कला इतिहासावर प्रकाश टाकणारे अनेक कार्यक्रम होतील.


हेही वाचा – मुंबई महापालिकेत हेरिटेज वॉकला सुरुवात


 

First Published on: February 4, 2021 10:59 PM
Exit mobile version