घरताज्या घडामोडीमुंबई महापालिकेत हेरिटेज वॉकला सुरुवात

मुंबई महापालिकेत हेरिटेज वॉकला सुरुवात

Subscribe

मुंबई महापालिका हेरिटेज इमारतीमध्ये अखेर आजपासून 'हेरिटेज वॉक' ला सुरुवात झाली आहे.

मुंबई महापालिका हेरिटेज इमारतीमध्ये अखेर आजपासून ‘हेरिटेज वॉक’ ला सुरुवात झाली आहे. या इमारतीचा इतिहास बघण्यासाखा आणि ऐकण्यासारखा आहे. जास्तीत जास्त पर्यटक याठिकाणी यायला हवेत. मुंबईत लपलेल्या पुरातन वास्तू पर्यटकांसाठी लवकरच खुल्या करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील पुरातन दुमजली इमारत ही १२८ वर्षे जुनी इमारत आहे. या इमारतीत हवा खेळती राहते आणि सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात येत असल्याने दिवसा विजेची जास्त गरज भासत नाही. अशा प्रकारची पर्यावरणाला अनुकूल जुनी इमारत आहे. २८ जानेवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ‘हेरिटेज वॉक’ उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. ‘हेरिटेज वॉक’ची संकल्पना सत्यात उतरविणारे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी काही पर्यटक आणि गाईड यांच्यासमवेत मुंबई महापालिकेच्या पुरातन इमारतीची सफर केली.

गेट वे, मुंबई विद्यापीठ येथेही ‘हेरिटेज वॉक’

मुंबई महापालिका मुख्यालय इमारतीत ज्या प्रमाणे ‘हेरिटेज वॉक’ उपक्रम राबविण्यात येत आहे आणि त्याला मिळालेला चांगला प्रतिसाद पाहता हेरिटेज वॉकच्या दृष्टीने हायकोर्टलाही विनंती केली आहे. तसेच, विधानभवनची पाहणी केली असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे, गेट वे ऑफ इंडियाचा परिसर आपण आणखी नीट करून घेत आहोत. गिलबर्ट हिल, कान्हेरी गुंफा, टायगर- लायन सफारी या गोष्टीवर सुद्धा काम करायचे आहे, असे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच, काळाघोडा येथील जुने सचिवालय, महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालय, गेटवे ऑफ इंडिया, मुंबई विद्यापीठ आदी ठिकाणी हेरिटीज वॉक हा उपक्रमी राबवला जाणार आहे. पोलीस संचालक कार्यालय व गेटवे ऑफ इंडिया येथील रास्ता सुट्टीच्या दिवशी बंद असतो. त्याठिकाणी पोलिसांची शिफ्ट चेंज होताना मिटिंग द ट्रीट हा १५ मिनिटांचा कार्यक्रम केला जाणार आहे. वानखडे स्टेडियम येथेही एक्सपिरियन्स टूर, मणिभवन काँग्रेस भवन येथे फ्रिडम वॉक ही संकल्पना राबवली जाणार असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.  किल्ल्यांच्या विकासासाठी व तेथील प्रयत्न वाढीसाठी सरकार प्रयत्नशील आहे. राज्यातील किल्ल्यांची पाहणी करायला पर्यटक येत असतात. शिवनेरी किल्ल्यासाठी ३०० कोटी रुपये देऊ केले आहेत. रायगड किल्ल्याचे कामही हाती घेण्यात येत आहे, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.

- Advertisement -

३०० रुपये तिकीट तरी दोन आठवडे बुकिंग फुल

भारतात, महाराष्ट्रात आणि मुंबईत प्रथमच ‘हेरिटेज वॉक’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. पालिका मुख्यालयाच्या हेरिटेज वॉकसाठी प्रत्येकी ३०० रुपये तिकीट आकारण्यात येत आहे. प्रत्येक गटात १५ याप्रमाणे शनिवार-रविवारी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी पालिका मुख्यालय पर्यटकांना दाखविण्यात येणार आहे. पुढील दोन आठवड्याचे सहा गटांचे बुकिंग अगोदरच फुल झाल्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
मुंबई महापालिका मुख्यालय इमारतीत ‘हेरिटेज वॉक’ साठी ‘बुक माय शो’ वर ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे. मुंबई महापालिका हेरिटेज वास्तू मुंबई महापालिकेच्या मालकीची असली तरी सर्व नियोजन एमटीडीसीकडून करण्यात येत आहे.

कोरोनाबाबत काळजी आवश्यकच

१ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी मर्यादित वेळेत लोकल ट्रेनची सेवा सुरू करण्यात याबाबत बोलताना मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, लोकल रेल्वे सुरू होत आहे.महाराष्ट्रात आपण दुकाने, शाळा, कॉलेज आदी टप्याटप्याने उघडतो आहोत.मात्र जगभरातून आजही कोरोना गेलेला नाही. ज्या देशात कोरोनाचे प्रमाण शून्यावर आले होते तेथे पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने लॉकडाऊन करावे लागल्याचे उदाहरण देत नागरिकांनी मास्क घालणं,सुरक्षित अंतर ठेवणे आणि हात स्वच्छ धुणे या त्रिसूत्रांचे पालन करणे आवश्यकच असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – वीजबिल भरा नाहीतर लाईट कापणार; ७१ लाख ग्राहकांना महावितरणाची नोटीस


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -