Kanjurmarg Fire: कांजूरमार्गच्या हेवी इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी

Kanjurmarg Fire:  कांजूरमार्गच्या हेवी इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी

Kanjurmarg Fire: कांजूरमार्गच्या हेवी इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी

मुंबईच्या कांजूरमार्ग  परिसरातील सॅमसंग सर्विस सेंटरमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. मात्र या आगीत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. प्राप्त माहितीनुसार, कांजूरमार्ग ( पूर्व), पोलीस स्टेशनजवळ, अँपेक्स कंपनी येथील सॅमसंग सर्विस सेंटरमध्ये रात्री ८.४५ वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.

मात्र आग हळूहळू वाढत गेल्याने अग्निशमन दलाने रात्री ९.२५ वाजताच्या सुमारास ही आग स्तर -२ ची तर रात्री १०.१८ वाजताच्या सुमारास स्तर -३ ची आग झाल्याचे जाहीर केले. अग्निशमन दलाकडून ८ फायर इंजिन व ४ वॉटर टँकर यांच्या साहाय्याने रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. या आगीत सॅमसंग सर्विस सेंटरचे मोथे आर्थिक नुकसान झाले. मोठ्या प्रमाणात सामान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. मात्र आग का कशी लागली, त्याची कारणे काय, वित्तीय हानी किती प्रमाणात झाली, याबाबत अग्निशमन दल, स्थानिक पोलीस तपास करीत असल्याचे समजते. आग लागली त्या ठिकाणी सॅमसंग कंपनीचे मोठे गोडाउन असल्याचे म्हटले जात आहे. या गोडाउनमध्ये सिलेंडर आणि वॉशिंग मशीन, लाकडाच्या काही वस्तू असल्याने मोठ्या प्रमाणात आग वाढत असून आगीचा भडका उडाला आहे. कांजूरमार्गच्या आजूबाजूच्या परिसरात धुराचे लोट पसरले आहेत.

गोडाउनमध्ये लाकूड,सिलेंडर आणि सॅमसंगच्या वस्तू असल्याने आग आणखी वाढत आहे. संध्याकाळी ७:३० च्या सुमारास आग लागल्यानंतर सर्व नागरिकांना बाहेर काढण्यात आल्याने गोडाउनमध्ये कोणीही अडकलेले नाही. मात्र तरी देखील काही लोक आत अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. अद्याप तरी या भीषण आगीत कोणताही जिवीत हानी झालेली नाही. गोडाउनमध्ये इलेक्ट्रिक्स वेअर हाऊसेस, सफोला ऑईल्स सारखे डिस्ट्रिब्युटर्स असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. कांजूरमार्ग येथे आग लागलेल्या ठिकाणच्या आजूबाजूचा परिसर हा इंडस्ट्रियल परिसर आहे. त्यामुळे आगीची माहिती मिळताच आजूबाजूच्या इमारतीतील नागरिकांना देखील बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


हेही वाचा – पेंग्विनच्या देखभालीसाठी जुन्याच कंत्राटदाराला मुदतवाढ

First Published on: November 15, 2021 10:39 PM
Exit mobile version