बेकायदेशीर सरकारला लाथ मारणे हा शिवसेनेच्या महाअधिवेशनाचा अजेंडा – संजय राऊत

बेकायदेशीर सरकारला लाथ मारणे हा शिवसेनेच्या महाअधिवेशनाचा अजेंडा – संजय राऊत

मुंबई : पुढील वर्षी लोकसभा, विधानसभा लागणार आहेत, याशिवाय पालिका निवडणुकांही कधीही लागू शकतात. यासाठी प्रत्येक पक्षाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याचपार्श्वभूमीवर शिवसेनेचे महाअधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात बेकायदेशीर सरकारला लाथ मारणे हा अजेंडा असणार आहे, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. (Sanjay Raut say Kicking illegal government is the agenda of Shiv Sena convention)

संजय राऊत म्हणाले की, येत्या 18 जूनला शिवसेनेची बैठक नाही, वरळीतील सभागृहात शिवसेनेचे महाअधिवेशन संपूर्ण दिवसभर होणार आहे.  सकाळी 11 ते रात्री 9 या वेळेत हे अधिवेशन पार पडणार असून राज्यातून नव्हे देशातून पदाधिकारी येतील. दहा हजार पदाधिकारी या महाअधिवेशनाला उपस्थित राहतील. प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार असल्यामुळ त्याला बैठक हे स्वरुप नसून महाअधिवेशन हे स्वरुप आहे. बेकायदेशीर सरकारला लाथ मारणे, हा या महाधिवेशनाचा अजेंडा असणार आहे.

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांचं सिंहासन लवकरच हलणार; शरद पवार शिंदे भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

वज्रमूठ कायम राहणार
संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर प्रतिक्रिया देताना वक्तव्य केले की, लोकसभा आणि विधानसभेचे संदर्भात जागा वाटप सुरळीतपणे पार पडेल. त्यामुळे कुणाला चिंता वाटण्याचे आणि आनंदाच्या उकाळ्या फुटण्याचं कारण नाही. प्रत्येक जागेवर सखोल चर्चा केली जाईल. कोण कोणती जागा जिंकू शकते, एकमेकांना कशी मदत करता येईल यावर चर्चा होईल. आमच्यात कोणतेही मतभेद होणार नाही आणि वज्रमूठ पुढेही कायम राहील, अशी स्पष्ट भूमिका संजय राऊत मांडली.

शिवाजी महाराजांची हिंदुराष्ट्राची संकल्पना वेगळी
भाजप आणि सरसंघचालक मोहन भागवत यांना टोला लगावताना वक्तव्य केले की, शिवाजी महाराजांविषयी जेवढा अभ्यास करावा तेवढा कमीच आहे. त्यांच्या राज्यात सर्व धर्म आणि जातीच्या लोकांना समान स्थान होते. महाराजांचे अंगरक्षक, तोफखाना सांभाळणारे मुस्लिम होते. शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते. त्यांनी जनतेला न्याय दिला. त्यांची हिंदुराष्ट्राची संकल्पना वेगळी होती. त्यांनी कधी चुकीची विधाने केली नाही. ते निधर्मी राजे असल्यामुळे त्यांनी सर्वांना सोबत घेऊन विश्वासात घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती.

राज्याभिषेक सोहळा देखणा करणं राज्यकर्त्यांचं कर्तव्य
रायगडावर साजरा होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे संजय राऊत यांनी स्वागत केले आहे. त्यांनी म्हटले की, आपण शिवाजी महाराजांच्या नावाने राज्य चालवतो. शिवाजी महाराज विश्वाचं दैवत आहे. शिवाजी महाराजाची जगात वाहवा केली जाते. त्यांचं युद्ध कौशल्य, प्रशासन, मानवतावाद, निधर्मीपणा याला मान्यता मिळाली आहे. त्यांचा राज्याभिषेक सोहळा अत्यंत देखणा करणं राज्यकर्त्यांचं कर्तव्य असल्याचे मत राऊत यांनी व्यक्त केले.

First Published on: June 2, 2023 1:17 PM
Exit mobile version