रेल्वेच्या तीनही मार्गावर आज असणार मेगाब्लॉक

रेल्वेच्या तीनही मार्गावर आज असणार मेगाब्लॉक

मेगाब्लॉक

रेल्वेच्या तीनही मार्गावरील अनेक कामांकरिता आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यासाठी कल्याण-ठाणे दरम्यान जलद मार्गावर आणि पनवेल-वाशी अप-डाऊन मार्गावर मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. या घेण्यात आलेल्य़ा मेगाब्लॉक दरम्यान मरिन लाईन्स-माहिम स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर पश्चिम रेल्वेने ब्लॉक काळातील कामे करण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे

कल्याण ते ठाणे या रेल्वे स्थानकादरम्यान अप जलद मार्गावर सकाळी १०.५४ ते दुपारी ३.५० वाजेपर्यंत हा मेगाब्लॉग घेण्यात येणार आहे. कल्याण ते ठाणे मार्गादरम्यान अप जलद लोकल धिम्या मार्गावर चालवण्यात येणार आहेत. त्यानंतर ठाणे ते सीएसएमटीपर्यंत पुन्हा जलद मार्गावर वळवण्यात येतील.

हार्बर मार्ग

पनवेल-वाशी आणि बेलापूर तसेच सीवूड-खार या रेल्वे स्थानकादरम्यान सकाळी ११.३० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत मेगाब्लॉग असेल. पनवेल-वाशी आणि बेलापूर तसेच सीवूड-खार या मार्गादरम्यान धावणाऱ्या लोकल रद्द करण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वे

मरीन लाइन्स ते माहीम या रेल्वे स्थानकादरम्यान सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत ब्लॉग असणार आहे. मरिन लाइन्स ते माहीम दरम्यान अंधेरीच्या दिशेने जाणाऱ्या धिम्या मार्गावर ब्लॉक असल्याने या मार्गावरील लोकल डाऊन जलद मार्गावर सुरू असतील. त्यामुळे महालक्ष्मी, प्रभादेवी, माटुंगा रोड स्थानकात धिम्या लोकल थांबणार नाहीत.

First Published on: November 17, 2019 11:12 AM
Exit mobile version