विरोधीपक्ष आणि प्रदेशाध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे मराठा-ओबीसी कार्ड

विरोधीपक्ष आणि प्रदेशाध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे मराठा-ओबीसी कार्ड

काँग्रेसची बैठक

गुरुवार, २३ मे रोजी लोकसभा निवडणूकांचा निकाल लागल्यानंतर काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी घडणार असून, आगामी विधानसभा निवडणुकीमूळे काँग्रेस मराठा आणि ओबीसी कार्ड या निवडीमध्ये खेळण्याची शक्यता असून, तसे संकेत महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेसच्या सर्व आमदारांना दिल्याचे काही आमदारांनी खासगीत बोलताना सांगितले. विधानसभा निवडणुका अवघ्या काहीच महिन्यांवर आल्या असून, त्या दृष्टीनेच कुणाला प्रदेशाध्यक्ष करायचे आणि कुणाला विरोधीपक्ष नेते पद द्यायचे याची चाचपनी करण्यासाठी सोमवारी विधान भावनात काँग्रेसच्या सर्व आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती.


वाचा – विवेकला अजूनही ऐश्वर्याची आठवणं येते? एक्झिट पोलवर शेअर केलं मीम


विशेष बाब म्हणजे या निवडीमागे मराठा आणि ओबीसी कार्ड खेळण्यामागे महत्वाचे कारण म्हणजे राज्यात मराठा आरक्षणावरून सरकार विरोधात मराठा समाज तसेच ओबीसी समाजामध्ये आधीच नाराजी आहे. याचा विचार करत हा मतदार आपल्याकडे कसा वळवता येणार आहे याचे मास्टर प्लॅन काँग्रेस आखत असल्याचे बोलले जात आहे.

विरोधीपक्ष नेता निवडीचा अधिकार राहुल गांधी यांना देण्यात आला आहे. याचा सर्व निर्णय राहुल गांधी घेणार आहेत. आज याला एकमताने अनुमोदन देण्यात आली आहे.
– नसिम खान, आमदार काँग्रेस

खरगेंची प्रत्येक आमदाराशी खासगीत चर्चा 

प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी आजच्या बैठकी दरम्यान प्रत्येक आमदाराला एक एकट्याला बोलावून खासगीत चर्चा करत त्यांची मते जाणून घेतली. तसेच यावेळी काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नवीन नेते निवडण्याचे अधिकार काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांना देण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. तसेच आमदार विजय वडेट्टीवार यांनी याचा ठराव मांडला. तर नसीम खान आणि आ. यशोमती ठाकूर यांनी त्या ठरावाला अनुमोदन दिले.


वाचा –  राज्यपालांनी केली मराठा आरक्षणाच्या अध्यादेशावर सही; मात्र विद्यार्थांचे आंदोलन सुरुच


पृथ्वीराज चव्हाण, थोरात आणि सातव यांच्या नावावर चर्चा 

राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यामधील वाद पाहता राधाकृष्ण विखे पाटील यांना धडा शिकवण्यासाठी बाळासाहेब थोरात यांना विरोधीपक्षनेते पद द्यावे का? असा विचार देखील सध्या सुरू असून, यावर देखील आमदरांशी खासगीत चर्चा झाल्याचे काही आमदारानी खासगीत बोलताना सांगितले. तर निकालानंतर काय स्थिती आहे हे पाहून प्रदेशाध्यक्षपद कुणाकडे द्यावे याची चर्चा देखील झाली. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राहुल गांधी यांचे सर्वात जवळचे आणि विश्वासू म्हणून ओळख असलेले राजीव सातव यांच्या देखील नावाचा विचार झाला. दरम्यान आज खर्गे यांनी जरी सर्वाची मते जाणून घेतली असली तरी देखील राहुल गांधी हेच याचा निर्णय घेणार आहे. त्यामुळे निकाला नंतर काय घडामोडी घडणार आहेत हे पहावे लागेल.

First Published on: May 20, 2019 8:44 PM
Exit mobile version