साकिनाका येथे आगीत गाळे खाक; सुदैवाने जीवितहानी टळली

साकिनाका येथे आगीत गाळे खाक; सुदैवाने जीवितहानी टळली

संग्रहित छायाचित्र

मुंबई : अंधेरी (पूर्व) साकिनाका येथील एका गळ्याला आग लागल्याची घटना घडली. गुरुवारी दुपारच्या सुमारास ही आग लागली असून या आगीत ५ ते ६ गाळे जळून खाक झाले. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झालेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी (पूर्व) साकिनाका, लिंक रोड, अजमेरी मस्जिदजवळ, अनिस कंपाऊंड, वायर गल्ली येथील एका गाळ्यात गुरुवारी दुपारी १.१५ वाजताच्या
सुमारास अचानक आग लागली. या आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. त्यानंतर काही अवधीतच अग्निशमन दलाने सदर भीषण आगीवर नियंत्रण मिळविले व आग विझविली.

या आगीची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. गाळ्यांना आग लागल्याचे समजताच बघ्यांची गर्दी जमली होती.

First Published on: January 26, 2023 8:49 PM
Exit mobile version