रेल्वेच्या हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक

रेल्वेच्या हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक

संग्रहित छायाचित्र

मुंबईतील रेल्वे प्रवाशांनो आज, रविवारी घराबाहेर पडण्याआधी मेगाब्लॉकचे वेळापत्रक वाचूनच बाहेर पडा. कारण रेल्वेच्या हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गांवर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. मध्य रेल्वेने नियमित देखभालीच्या कामसाठी रविवार २२ जानेवारी रोजी मेगाब्लॉक घोषित केला आहे. त्यानुसार, ट्रन्सहार्बर मार्गावरील ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकादरम्यान आणि हार्बर रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे मार्गावर हा मेगाब्लॉक असणार आहे. दिलासादायकबाब म्हणजे रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक नसेल. (Mega block on harbor railway line and trance harbor line on Sunday)

ट्रान्सहार्बर रेल्वे

ट्रान्सहार्बर मार्गावरील ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकादरम्यान अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक असेल. सकाळी ११.१० पासून ते दुपारी ४.१० पर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉकच्या कालावधीत ठाणे येथून सकाळी १०.३५ ते सायंकाळी ४.०७ वाजेपर्यंत वाशी/नेरुळ/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाउन मार्गावरील सेवा आणि वाशी/नेरुळ/पनवेल येथून सकाळी १०.२५ ते सायंकाळी ४.०९ वाजेपर्यंत ठाणे करीता सुटणाऱ्या अप मार्गावरील सेवा रद्द राहणार आहेत.

हार्बर रेल्वे

हार्बर रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक असणार आहे. रविवारी सकाळी ११.४० पासून ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत ब्लॉक असणार आहे. या ब्लॉकच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहेत.

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ पासून ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोडसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहेत. या ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जाणार आहेत.


हेही वाचा – शिवसेना पक्षचिन्हासह पक्षप्रमुखपदही अधांतरी, निवडणूक आयोगासमोर ३० जानेवारीला सुनावणी

First Published on: January 22, 2023 7:31 AM
Exit mobile version