रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

Mega block

उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान काही लोकल फेर्‍या रद्द करण्यात येतात. तर काही लोकल फेर्‍या 20 ते 25 मिनिटे विलंबाने धावणार आहे. त्यामुळे रविवारी रेल्वे प्रवाशांनी लोकलचे वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडावे,असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते माटुंगा डाऊन धीम्या दिशेने सकाळी 10.50 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉक दरम्यान माटूंगा स्थानकापर्यंत डाऊन धीम्या लोकल डाऊन जलद मार्गवर वळविण्यात येणार आहे. यामुळे सर्व धीम्या लोकल वेळापत्रकाच्या 10 मिनिटे विलंबाने धावतील. तर हार्बर रेल्वे मार्गंवर मानखुर्द ते नेरुळ अप- डाऊन मार्गावर सकाळी 11.30 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी सीएसएमटी – पनवेल/बेलापूर/वाशी – सीएसएमटी या लोकल रद्द असणार आहेत. मात्र ब्लॉकदरम्यान सीएसएमटी ते मानखुर्द विशेष लोकल चालविण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वेवरही ब्लॉक
पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान अप-डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10.35 ते दुपारी 03.35 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान मुंबई सेंट्रल स्थानकापर्यंत अप-डाऊन धीम्या मार्गावरील लोकल अप-डाऊन जलद रेल्वे मार्गावरून चालविण्यात येणार आहे. याकाळात काही लोकल रद्द असणार आहेत.

First Published on: February 22, 2020 3:18 AM
Exit mobile version