रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाकडून रेल्वेच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक (megablock) घोषित करण्यात आला आहे. या मेगाब्लॉकदरम्यान एक्स्प्रेस गाड्या (Express trains) धिम्या मार्गावरून वळवण्यात आल्या आहेत. (Megablock On central western harbor railway line)

मध्य रेल्वेच्या भायखळा-माटुंगा स्थानकादरम्यान ब्लॉक असेल. हार्बर रेल्वेच्या सीएसएमटी – चुनाभट्टी/वांद्रेदरम्यान ब्लॉक असेल. तसेच, पश्चिम रेल्वेच्या माहीम आणि वांद्रेदरम्यान ब्लॉक असेल.

मध्य रेल्वे

मध्य रेल्वेच्या भायखळा-माटुंगा मार्गावरील अप जलद मार्गावर (शनिवारी/रविवारी) रात्री ११.३० ते पहाटे ४.३० पर्यंत आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ००.४० ते पहाटे ५.४० पर्यंत ब्लॉक असणार आहे. सकाळी ५.२० वाजल्यापासून सीएसएमटीहून सुटणारी जलद सेवा धिम्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. रात्री १०.५८ ते ११.१५ या वेळेत ठाण्याहून सुटणाऱ्या अप जलद गाड्या धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. तसेच, अप आणि डाऊन जलद मार्गांवर थांबणाऱ्या मेल/एक्स्प्रेस धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.

त्यानुसार, सीएसएमटी-मडगाव जन शताब्दी एक्स्प्रेस दादर प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर दुहेरी थांबा दिला जाणार आहे. अप गाड्या दादर प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर दुहेरी थांबा घेतील आणि निर्धारित वेळेच्या १०-१५ मिनिटे उशिरा येतील. अमृतसर-सीएसएमटी एक्सप्रेस, ११०२० भुवनेश्वर-सीएसएमटी कोणार्क एक्सप्रेस, हावडा-मुंबई मेलचा थांबा बदलला आहे.

हार्बर रेल्वे

हार्बर रेल्वेच्या सीएसएमटी – चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान लोकल सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० पर्यंत बंद राहतील. तर, चुनाभट्टी/वांद्रे – सीएसएमटीदरम्यानची वाहतूक सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत बंद असेल. सीएसएमटी/वडाळा ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

पश्चिम रेल्वे

पश्चिम रेल्वेच्या सकाळी १०.५५ ते दुपारी ४.५५ पर्यंत माहीम आणि वांद्रे दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्ग सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत वांद्रे आणि अंधेरी दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्ग मेगाब्लॉक असेल.


हेही वाचा – ‘कब तक छीपोगे…’, झिरवळांचा फोटो शेअर करत संजय राऊतांचा बंडखोर आमदारांना टोला

First Published on: June 26, 2022 9:11 AM
Exit mobile version