खर्च परवडेना, MMRDA मोनोरेल विकण्याच्या तयारीत

खर्च परवडेना, MMRDA मोनोरेल विकण्याच्या तयारीत

MMRDA मोनोरेल विकण्याच्या तयारीत

मुंबई मोनोरेलचा खर्च आवाक्याबाहेर गेल्याने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) मोनोरेल विकण्याच्या तयारीत आहे. मोनोरेल खासगी कंपनीकडे सोपविण्यासाठी हालचाली देखील सुरु झाल्या आहेत. मुंबई मोनोरेल प्रकल्पावर आतपर्यंत तीन हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. एवढा खर्च करुन देखील या प्रकल्पासमोरील अडचणी दूर झालेल्या नाहीत. यामुळे MMRDA मोनोरेल विकण्याच्या तयारीत आहे.

कोरोनाचा फटका जसा इतर क्षेत्रांना बसला आहे, तसाच फटका MMRDA ला बसला आहे. अनेक प्रकल्प लांबणीवर गेल्याने खर्चात वाढ झाली आहे. त्यात मेट्रो – ३ कारशेड उभारण्याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने जबरदस्त फटका हा MMRDA बसला आहे. MMRDA ला रोज चार कोटी रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यात केंद्राकडूनदेखील राज्याच्या वाट्याचा जीएसटी निधी अडवून ठेवल्याने अप्रत्यक्षरीत्या सर्वच प्रकल्पांवर त्याचा परिणाम होत आहे.

मोनोरेलची देखभाल करणाऱ्या कंपन्या जागतिक स्तरावर कमी आहेत. तसंच, जगात एकूण वाहतूक व्यवस्थेत ‘मोनोरेल’चे प्रमाण पाच टक्क्यांपेक्षाही कमी आहे. यामुळे ‘मोनोरेल’चं परिचालन आणि व्यवस्थापन खासगी कंपनीकडे देण्याबाबत ‘एमएमआरडीए’ सकारात्मक आहे. त्यामुळे मोनोरेलची देखभाल करण्यासाठी कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी व्यावसायिक विकास करण्याची मुभा देखील संबंधितांना देण्यात येणार आहे.

 

 

First Published on: July 16, 2021 12:01 PM
Exit mobile version