Mumbai Bridge Collapse : CSMT पूल दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू

Mumbai Bridge Collapse : CSMT पूल दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू

CSMT bridge Collapse

मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशन बाहेरील पादचारी पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. सायंकाळी साडे सातच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. या घटनेत अनेकजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेमध्ये ६ जणांचा मृत्यू झाला असून ३४ जण जखमी झाले आहेत. जखमींवर जी.टी आणि सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपूर्वा प्रभू (३५) आणि रंजना तांबे (४०), झाहिद शिराज खान (३२), सारिका कुलकर्णी (३५), तापेंद्र सिंह (३५) आणि मोहन कायगुडे (५८) अशी मृतांची नावे आहेत.

हे वाचा – Mumbai Bridge Collapse : नाईट शिफ्ट बेतली जीवावर

 सीएसटी स्टेशनवर गर्दी

ऐन सायंकाळी ही दुर्घटना घडली असल्यामुळे येथे लोकांची एकच गर्दी जमली. या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना वळवण्यात आले आहे. येथे जमा झालेल्या लोकांना रेल्वे फलाटावर हलवण्यात आल्यामुळे फलाटावर एकच गर्दी झाली आहे.

गाड्यांवर कोसळला पूल

सायंकाळी हा पूल या परिसरातून जाणाऱ्या गाड्यांवर कोसळला. दुर्घटनेनंतर येथील स्थानिकांनी पूलाचा भाग उचलण्याचा प्रयत्न केला. या पूलावर असलेले नागरिक आणि पूला खालून जाणारे नागरिक गंभीर रित्या जखमी झाले आहेत. हा पादचारी पूल ब्रिटिश कालीन असून या पूलाचे ऑडिट झालेले नसल्याचे सांगण्यात आले आहे. महानगर पालिकेन जुन्या ब्रिजचे ऑडिट करण्याचे आदेश दिले होते मात्र रेल्वे प्रशासाने ऑडिट केले नसल्याचा आरोप नगरसेविका सुजाता सानप यांनी दिली.

 

First Published on: March 14, 2019 7:52 PM
Exit mobile version