Mumbai Corona Update: मुंबईत २४ तासांत नव्या रुग्णसंख्येत घट, तर मृत्यूच्या संख्येत किंचित वाढ

Mumbai Corona Update: मुंबईत २४ तासांत नव्या रुग्णसंख्येत घट, तर मृत्यूच्या संख्येत किंचित वाढ

Mumbai Corona Update : मुंबईकरांना मोठा दिलासा, २४ तासात शून्य रुग्ण मृत्यूसह ४४ कोरोनाबाधितांची नोंद

मुंबईत आज, गुरुवारी नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली असून मृत्यूच्या संख्येत किंचित वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत ५४० नव्या कोरोनाबाधित आढळले असून १३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. काल, बुधवारी ६६४ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली होती आणि ९ जणांच्या मृत्यू झाला आहे. मात्र आज मुंबईतच्या मृत्यूच्या संख्येत ४ने वाढ झाली आहे. आता मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख २६ हजार ८२४वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १५ हजार ५८६ जणांचा मृत्यू झाला आहे.

आज दिवसभरातील मुंबईतील ६२८ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ७ लाख १ हजार १९५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत ७ हजार ७१४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत आज ३७ हजार ८०२ नमुन्यांच्या झाल्या आहेत. आतापर्यंत एकूण ७४ लाख २३ हजार ४८३ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत.

मुंबईत आज मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी १२ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. ७ रुग्ण पुरुष आणि ६ रुग्ण महिल्या होत्या. १ रुग्णाचे वय ४० वर्षाखाली होते. १० रुग्णांचे वय ६० वर्षांवर होते आणि उर्वरित २ रुग्ण ४० ते ६० वयोगटातील होते. मुंबईत रुग्ण बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९६ टक्के आहे. १ जुलै ते ७ जुलैपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.०८ टक्के इतका असून दुप्पटीचा दर ८५८ दिवस आहे.


हेही वाचा – अपुऱ्या लसींच्या पुरवठ्यामुळे मुंबईतील लसीकरण केंद्र ९ जुलैपर्यंत बंद


 

First Published on: July 8, 2021 8:24 PM
Exit mobile version