Mumbai Cruise Drugs: कॉर्डेलिया क्रूझचा ड्रग्ज पार्टीशी काहीही संबंध नाही, कॉर्डेलिया कंपनीचे स्पष्टीकरण

Mumbai Cruise Drugs: कॉर्डेलिया क्रूझचा ड्रग्ज पार्टीशी काहीही संबंध नाही, कॉर्डेलिया कंपनीचे स्पष्टीकरण

Mumbai Cruise Drugs: कॉर्डेलिया क्रूझचा ड्रग्ज पार्टीशी काहीही संबंध नाही, कॉर्डेलिया कंपनीचे स्पष्टीकरण

मुंबईहून गोव्याला निघालेल्या कार्डेलिया लाइनर एम्प्रेस क्रूझवर (Cordelia Cruise) एनसीबीने (NCB) छापा टाकला. अभिनेता शाहरुख खानचा (shahrukh Khan) मुलगा आर्यन खानसह (aryan Khan) १० जणांना एनसीबीने ताब्यात घेतले आहे. क्रूझवर मोठ्या प्रमाणात MDMA/ एक्स्टसी, कोकेन, MD (मेफेड्रोन) आणि चरस सारख्या विविध वस्तूंचा साठा जप्त करण्यात आला. क्रूझवर अमली पदार्थांचा साठा आला कसा यासंदर्भात कार्डेलिया क्रूझ लाइनर एम्प्रेस क्रूझचे मालक आणि पार्टीचे आयोजन करणाऱ्या कंपनीच्या मालकांना एनसीबीकडून समन्स बजावून त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. चौकशीदरम्यान कार्डेलिया क्रूझ कंपनीने, ड्रग्ज पार्टीचा कार्डेलिया क्रूझशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात कॉर्डेलिया क्रूझचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जर्गन बेलोम यांनी एक निवेदन जारी केले आहे.

कार्डेलिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की, २ ऑक्टोबर रोजी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डेलिया क्रूझवर करण्यात आलेल्या ड्रग्ज प्रकरणात कार्डेलिया क्रूझचा कोणताही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संबंध नाही. कंपनीने क्रूझ एका खासगी कार्यक्रमाला दिल्लीतील एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला भाड्याने दिली होती.

कंपनीने पुढे असे म्हटले आहे, अनेक कुटुंब कार्डेलिया क्रूझसोबत प्रवास करणे निवडतात कारण कार्डेलिया प्रवाशांचे उत्तम मनोरंजन करते. काल घडलेली घटना ही कार्डेलियाच्या अगदी विरोधी आहे. कार्डेलिया क्रूझ ज्या संस्कृतीचे प्रतिनिधित्व करते त्यापासून ही घटना फार लांब आहे. कंपनी या प्रकरणाचा निषेध करतो. एनसीबीच्या पुढील तपासाठी कार्डेलिया पूर्ण सहकार्य करेल, असे कंपनीने म्हटले आहे.

एनसीबीने क्रूझ समुद्राच्या मध्यावर गेल्यानंतर धाड टाकली. ड्रग्ज सापडल्यानंतर आरोपींना त्वरित कार्डेलियामधून खाली उतरवण्यात आले.ज्यामुळे इतर प्रवाशांना प्रवास करताना त्रास सहन करावा लागला. त्याचप्रमाणे क्रूझवर स्टेज शो, खाण्यापिण्याची व्यवस्था तसेच गरबा डान्स आणि क्रूझवर होणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमांची सुविधा करण्यातही उशिर झाला. त्यासाठी कंपनी क्रूझवरील सर्व प्रवाशांची माफी मागते,असे कंपनीने म्हटले आहे.


हेही वाचा – शाहरुखपुत्र ते डेटींग मास्टर ‘आर्यन खान’च वादग्रस्त प्रोफाईल

First Published on: October 3, 2021 4:21 PM
Exit mobile version