घरताज्या घडामोडीशाहरुखपुत्र ते डेटींग मास्टर 'आर्यन खान'च वादग्रस्त प्रोफाईल

शाहरुखपुत्र ते डेटींग मास्टर ‘आर्यन खान’च वादग्रस्त प्रोफाईल

Subscribe

एनसीबीने शनिवारी रात्री मुंबईच्या समुद्रात क्रुझवर सुरु असलेल्या रेव्ह पार्टीप्रकरणी १० जणांना ताब्यात घेतले आहे. यात बॉलीवूडचा किंग शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानचाही समावेश आहे. सध्या एनसीबीकडून आर्यनची चौकशी करण्यात येत आहे. याघटनेमुळे नेहमी लाईमलाईटपासून दूर राहणारा आर्यन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पण वादामध्ये सापडण्याची आर्यनची ही पहीली वेळ नसून डेटींग आणि एका इंटीमेट व्हायरल व्हिडीओमुळेही तो याआधी चर्चेत आला होता.

- Advertisement -

बॉलीवूडचा किंग असलेल्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन हा सर्वाधिक लोकप्रिय स्टार किड्स आहे. त्याचे फॅन फोलॉईंगची संख्याही एखाद्या स्टारच्या चाहत्यांच्या संख्येएवढी आहे. आर्यनचे फोटोही नेहमीच सोशल मिडियावर चर्चेचा विषय असतात. आर्यन हा शाहरुख यांच्यात कमालीचे साम्य असल्याने शाहरुखचे चाहतेदेखील आर्यनवर फिदा असतात. त्याची स्टाईल आणि चार्मिंग लूकचे तरुणींमध्ये क्रेझ आहे.

आर्यनचा जन्म १३ नोव्हेंबर १९९७ रोजी दिल्लीत झाला. पण शाहरुखचा मोठा मुलगा असूनही आर्यन नेहमी लाईमलाईट पासून दूर राहतो. लंडनमधील सेव्हन ओक्समध्ये Seven Oaks त्याने शिक्षण घेतलं असून University of Southern California मधून त्याने फिल्म मेकींग आणि रायटींगमध्ये डिग्री मिळवली आहे. एवढचं नाहीतर त्याने शाहरुखच्या काही चित्रपटात बालकलाकाराचीही भूमिका केली आहे.

- Advertisement -

टकभी खुशी कभी गमट या चित्रपटात त्याने शाहरुखच्या बालपणाची भूमिका केली होती.त्यानंतर ‘कभी अलविदा ना कहना’ यातही त्याने छोटी भूमिका केली पण एडींटींगमध्ये तो सीनच काढून टाकण्यात आला होता. ‘हम है लाजवाब आणि द लायन किंग’ सारख्या चित्रपटात आर्यनने डबिंगही केलं होते. त्यासाठी त्याला बेस्ट डबिंग चाईल्ड वॉईस आर्टीस्ट म्हणून अवॉर्डही मिळाला होता.

आर्यन फिटनेस फ्रीक आहे. मार्शल आर्टही त्याने शिकला असून तायक्वांडोमध्ये त्याने ब्लॅक बेल्ट मिळवला आहे. महाराष्ट्र तायक्व्वांडो स्पर्धेत त्याने गोल्ड मेडलही मिळवलं आहे.फिल्म मेकींग आणि डायरेकश्नमध्ये त्याला रस आहे. पण एवढं सगळ असलं तरी आर्यनची चर्चा होते ती डेटींगबद्दल. फ्रेंड सर्कलमध्ये त्याला डेटींग मास्टरही म्हणूनही ओळखले जाते. मुलींबरोबर मैत्री करण्यात त्यांच्याबरोबर डेटवर जाण्यात आर्यन मास्टर असल्याचं त्याचे मित्रच सांगतात.अनेक हायफाय घराण्यातील तरुणींबरोबर त्याच नाव जोडलं जातं. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची नात श्वेता बच्चनची मुलगी नव्या नवेली हीच्याबरोबरही आर्यनची मैत्री गाजली होती.

आर्यन एका mms प्रकरणातही अडकला होता. सोशल मिडियावर आर्यनचा एका तरुणीबरोबर कारमध्ये आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल झाला होता. पण नंतर तो व्हिडीओ फेक असल्याचं सांगितल गेलं होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -