दहीहंडी उत्सवाला गालबोट, एका गोविंदाचा मृत्यू

दहीहंडी उत्सवाला गालबोट, एका गोविंदाचा मृत्यू

दहीहंडी दरम्यान मृत्यूमुखी पडलेला धारावीतील कुश खंदारे

मुंबईसह, ठाणे, नवी मुंबई अशा अनेक भागांमध्ये सकाळपासूनच दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतो आहे. मात्र,
एकीकडे दहीहंडीचा जल्लोष पाहायला मिळत असताना दुसरीकडे काही ठिकाणी या उत्सवाला गालबोट लागल्याचं दिसत आहे. दहीहंडीदरम्यान २६ वर्षीय कुश खंदारे या गोविंदाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. कुश खंदारे हा धारावीच्या बाळगोपाळ मित्रमंडळाचा गोविंदा होता. सायन हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,  हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वीच कुश याचा मृत्यू झाला होता. कुश थरावर चढत असताना त्याला अचानक फिट आली. तात्काळ त्याला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

 

 

सायन रुग्णालयातील नोंद

सायन रुग्णालयातून दिलेल्या माहितीनुसार, कुश खंदारेचा सायन रुग्णालयात नेण्याआधीच मृत्यू झाला होता. शिवाय, त्याच्या पोस्टमार्टम रिपोर्ट नंतरच मृत्यूचं नेमकं कारण काय ? हे स्पष्ट होईल असं ही रुग्णालयाने स्पष्ट केलं आहे. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत एकूण ८६ गोविंदा जखमी झाले होते. त्यापैकी ३७ गोविंदांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, ४८ गोविंदांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जखमी गोविंदांची आकडेवारी

तर, या सर्वांची प्रकृती सध्या ठिक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

७ वर्षाचा गोविंदा ही जखमी –

सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल झालेल्या गोविंदामध्ये एका ७ वर्षाच्या मुलाचा समावेश होता अशी माहिती सेंट जॉर्ज रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मधुकर गायकवाड यांनी ‘माय महानगर’ ला दिली आहे.

” सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल झालेल्या जखमी गोविंदांना आता डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यापैकी एक ७ वर्षाचा मुलगा होता. धू्रव म्हात्रे असं या मुलाचं नावं आहे. संध्याकाळी ६.२० ला हा गोविंदा रुग्णालयात दाखल झाला होता.  त्याच्या नाकाला जबर मार बसला होता. त्याच्यावर उपचार करुन त्याला घरी सोडण्यात आलं आहे. याशिवाय, बाकी ४ गोविंदांना ही उपचार देऊन सोडण्यात आलं आहे. ”

डॉ. मधुकर गायकवाड, वेद्यकीय अधीक्षक, सेंट जॉर्ज

 

First Published on: September 3, 2018 6:11 PM
Exit mobile version