इथिओपिआच्या धावपटू डेरारा हरीसा ठरला मॅरेथॉनचा विजेता

इथिओपिआच्या धावपटू डेरारा हरीसा ठरला मॅरेथॉनचा विजेता

दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई मॅरेथॉन पार पडली. प्रत्येक वर्षाच्या तिसऱ्या रविवारी या मॅरेथॉन आयोजन केले जाते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या ड्रीम रनला सुरुवात झाली. ही मॅरेथॉन आशियातील सर्वात मोठी व मानाची समजली जाते. या मॅरेथॉनला ‘गोल्ड लेबल’ दर्जा मिळालेला आहे. त्यात कडाक्याच्या थंडीला न जुमानता मुंबईकरांनी मोठ्या संख्येने मुंबई मॅरेथॉनला उपस्थिती लावली आहे. या वर्षीदेखील देश-विदेशातील नामांकित धावपटू मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. केनिया, इथियोपियाचे धावपटू यासाठी प्रबळ दावेदार मानले जातात. मुंबई मॅरेथॉनच्या मुख्य स्पर्धेत अर्थात एलिट रनमध्ये यंदाही इथिओपिआच्या धावपटूंने म्हणजेच डेरारा हरीसा विजेता ठरला आहे. इथिओपिआच्या डेरारा हरीसाने मुंबई मॅरेथॉन स्पर्धेचा नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे.

यंदाच्या मुंबई मॅरेथॉनचे १७ वे पर्व असून एकूण ४ लाख २० हजार यूएस डॉलर बक्षिस आहेत. या मॅरेथॉनसाठी देश-विदेशातील अव्वल धावपटूंसह हौशी स्पर्धकांनीही या स्पर्धेत भाग घेतला आहे. अर्धमॅरेथॉन महिला गटात उत्तर प्रदेशची पारुल चौधरी हिने प्रथम क्रमांकाचं स्थान पटकावलं आहे. तर मुंबई कस्टम्सची आरती पाटीलने दुसरा क्रमांक आणि नाशिकच्या मोनिका आथरेचा तिसरा क्रमांक पटकावला आहे.

मॅरेथॉनला गालबोट

मुंबईच्या मॅरेथॉनला गालबोट लागले आहे. स्पर्धेत एका ६४ वर्षीय इसमासा मृत्यू झाला आहे. गजानान मार्लेकर असं या स्पर्धकाचे नाव आहे. त्यांना जवळच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.
गजानन मार्लेकर यांच्याबरोबर आणखी दोनजणांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले. हिमांशु ठक्कर (वय ४०) अस या अॅडमिट केलेल्या स्पर्धकाचं नाव आहे.

First Published on: January 19, 2020 12:29 PM
Exit mobile version