मुंबईकरांनो काळजी घ्या, दिवस कडाक्याच्या थंडीचे – IMD

मुंबईकरांनो काळजी घ्या, दिवस कडाक्याच्या थंडीचे – IMD

मुंबईकरांना गेल्या काही दिवसात सातत्याने थंडीचा कडाका अनुभवायला मिळत आहे. यंदाच्या मोसमातला निच्चांक गाठत मुंबईत आज तापमान हे १५ डिग्री सेल्सिअस इतके होते. सांताक्रुझ वेधशाळेत १५ डिग्री सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची तर कुलाबा वेधशाळेत १७ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. येत्या २४ तासांमध्ये हा ट्रेंड कायम राहणार असल्याचे प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई (आयएमडी) ने स्पष्ट केले आहे. त्यानंतर मात्र तापमानात वाढ होईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबईतील काही भागात मात्र थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. काही भागात थंडीचा पारा आणखी खाली जाऊ शकतो, त्यामुळे मुंबईकरांनो काळजी घ्या असे आयएमडीचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईतल्या कमाल तापमानातही वाढ पहायला मिळाली आहे. मुंबईतले सांताक्रुझ वेधशाळा येथील कमाल तापमान हे २९.४ डिग्री सेल्सिअस तर कुलाबा वेधशाळा येथील तापमान २७.६ डिग्री सेल्सिअस इतके होते. पण मुंबईतल्या थंडीचा पारा घसरल्याने मात्र मुंबईच्या हवेवर परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. सिस्टिम ऑफ एअर क्वालिटी वेदर फोरकास्टिंग एण्ड रिसर्च (सफऱ) संस्थेच्या माहितीनुसार मुंबईत मंगळवारी हवेच्या प्रदुषणात वाढ झाल्याचे पहायला मिळाले आहे. मुंबईची हवा खराब झाल्याचे सफरने स्पष्ट केले आहे. मुंबईसह परिसरातही थंडीचा चांगला प्रभाव पहायला मिळाला आहे. मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भातही थंडीचा चांगलाच प्रभाव पहायला मिळाला आहे.

पुण्यामध्ये १३.१ डिग्री सेल्सिअस, नाशिकमध्ये ११.८ डिग्री सेल्सिअस, जळगावमध्ये १०.६ डिग्री सेल्सिअस, नागपुरमध्ये १४.२ डिग्री सेल्सिअस, अकोल्यात १२.६ डिग्री सेल्सिअस, गोंदियात १२.८ डिग्री सेल्सिअस अशी तापमानाची नोंद झाली. त्याशिवाय रत्नागिरीत १८.२, हर्णे १९.७

 

 

First Published on: December 29, 2020 2:35 PM
Exit mobile version