खरंच? ४० मिनिटांत वडखळ!!!

खरंच? ४० मिनिटांत वडखळ!!!

प्रातिनिधीक फोटो

वडखळ नाका!! प्रवास म्हटलं की, बापरे बाप, डोक्याला ताप, अशीच काहीशी प्रतिक्रिया नेहमी डोक्यात येते. कोकणात जायचं झालं तर वडखळ नाक्यावरून जावं लागतं. पण, वडखळ नाक्यावर पोहोचायला लागणारा वेळ पाहता प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी असते. ट्राफिक, रस्त्यांची अवस्था पाहिल्यानंतर ‘नको तो प्रवास’ अशीच प्रतिक्रिया प्रवाशांमध्ये असते. पण, आता मुंबईहून वडखळला पोहोचायला तुम्हाला केवळ ४० मिनिटं लागतील असं तुम्हाला कुणी सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल? हो, हे शक्य होणार आहे. केंद्रीय वाहतूक आणि रस्ते मंत्री नितीन गडकरींनी त्यासाठी एक नामी युक्ती शक्ती शोधून काढली आहे. जलमार्गानं मुंबई ते वडखळ हे अंतर केवळ ४० मिनिटामध्ये कापले जाणार आहे. राष्ट्रीय पत्रकारिता कल्याण न्यासाने आयोजित केलेल्या समृद्धीचे महामार्ग या विषयावर बोलताना नितीन गडकरींनी ही माहिती दिली. जलमार्गाचा हा प्रयोग यशस्वी झाल्यास मुंबई ते वडखळ हे काही तासांचं अंतर केवळ ४० मिनिटावर येणार आहे. यावेळी नितीन गडकरींनी अनेक विषयांबद्दल माहिती दिली.

मुंबईमध्ये समुद्राचे खारे पाणी  पिण्यायोग्य करण्याचे आवाहन आपल्यासमोर असून चेन्नईमध्ये पाणी शुद्धीकरणाचा प्रयोग छोट्या प्रमाणावर होत आहे. तो आता व्यापक स्तरावर करण्यात यावा अशी शिफारस देखील नितीन गडकरींनी केली. शिवाय जलवाहतुकीवर देखील त्यांनी आपले मत मांडले. जलवाहतूक ही परवडणारी आणि सोयीची असल्याचे मत नितीन गडकरींनी व्यक्त केले. त्यामुळे आगामी काळात जलवाहतुकीला सरकार प्राधान्य देणार ही बाब यावरून तरी स्पष्ट होत आहे. शिवाय, मुंबई ते वडखळ या प्रवासासाठी लागणारा वेळ देखील कमी होणार आहे.

First Published on: November 18, 2018 10:55 AM
Exit mobile version