मुंबई विद्यापीठ बॉम्बने उडवू, अज्ञाताकडून धमकी, मेलवरुन शिवीगाळ

मुंबई विद्यापीठ बॉम्बने उडवू, अज्ञाताकडून धमकी, मेलवरुन शिवीगाळ

मुंबई विद्यापीठ बॉम्ब स्फोट घडवून उडवू अशी धमकी अज्ञाताकडून देण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठात परीक्षांच्या निकालांचे कामकाज सुरु आहे. अज्ञाताकडून मुंबई विद्यापीठाला बी कॉमचे निकाल लवकर लावा यासाठी शिवीगाळ आणि धमकी देण्यात आली आहे. दरम्यान मुंबई विद्यापीठाला १०, ११ , १२ ऑगस्ट या तारखांना धमकीचे मेल आले आहेत. मुंबई विद्यापीठाने धमकीचे मेसेज प्राप्त झाल्यानंतर थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. विद्यापीठाच्या तक्रारीनुसार सायबर पोलीसांनी तपास सुरुकेला आहे. काही दिवसांपुर्वी मंत्रालयात बॉम्ब स्फोट घडवण्याबाबत फेक कॉल करण्यात आला होता.

मुंबई विद्यपीठात परीक्षांच्या निकालांबाबतचं कामकाज सुरु आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक विषयांचे निकाल रखडले आहेत. अज्ञात व्यक्तीने निकाल लवकरात लवकर लावण्यासाठी मुंबई विद्यापीठाला धमकीचा मेल केला आहे. या धकमीच्या मेलमध्ये अज्ञाताने BSC,BA,B.com या कोर्सेसच्या अंतिम म्हणजेच ६ सेमिस्टरचे निकाल लवकरात लवकर लावले नाही तर बॉम्ब स्फोटने उडवून टाकू अशी धमकी दिली आहे. या मेलमध्ये बॉम्ब स्फोटाची चित्रे पाठवून धमकी दिली आहे.

कसा आला प्रकार समोर

मुंबई विद्यापीठाच्या इमेल आयडीवरील आलेले मेल तपासत असताना अज्ञात व्यक्तीने १०,११ आणि १२ तारखेला धमकीचे मेल पाठवल्याचे सापडले आहे. या मेलमध्ये निकाल लवकरात लवकर लावा असे म्हटलं आहे. मुंबई विद्यापीठ प्रशासनानं या प्रकरणी थेट पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा नोंदवला आहे. सायबर पोलीसांनी तात्काळ या गुन्ह्याचा तपास करायला सुरुवात केली आहे.

मंत्रालय उडवण्याची धमकी

मुंबईत फेक कॉल आणि मेसेज करुन बॉम्ब स्फोट करुन उडवण्याच्या धमकी प्रकरणात वाढ झाली आहे. काही दिवसांपुर्वी मंत्रालयाच्या परिसरात बॉम्ब स्फोट घडवून आणणार असल्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी अज्ञातांना ताब्यात घेतलं होते. तसेच काही दिवसांपुर्वी अभिनेता अमिताभ बच्चनच्या बंगल्याजवळील परिसरात आणि ३ रेल्वे स्थानकांवर बॉम्ब स्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली होती.

First Published on: August 14, 2021 11:53 AM
Exit mobile version