मुंबईत उद्या मॉन्सूनचा पाऊस, पण जोर राहणार कमी

मुंबईत उद्या मॉन्सूनचा पाऊस, पण जोर राहणार कमी

मुंबईमधील पावसाचे संग्रहित छायाचित्र

मॉन्सूनचा पाऊस येत्या ४८ तासात मुंबईत धडकण्याची शक्यता स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने वर्तविली आहे. मात्र मुंबई मान्सूनला सुरुवात जोरदार अशी होणार नाही. मान्सूनच्या आगमनाच्या वेळी शहरात होणारा जोरदार पाऊस यावर्षी अपेक्षित नाही. तथापि, काही चांगल्या सरींची शक्यता नाकारता येत नाही, असेही स्कायमेट संस्थेने म्हटले आहे.

मुंबईकर मान्सूनची आतुरतेने वाट पाहत आहेत. मुंबईत मान्सून ला आधीच वेळापत्रकाच्या १३ दिवस उशीर झालेला आहे आणि त्यामुळे पावसाला देखील विलंब झालेला आहे. तथापि, मान्सून आता उंबरठयावर येऊन उभा आहे आणि पुढील ४८ तासांच्या कालावधीत मुंबईत चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. स्कायमेट हवामानतज्ञांच्या अनुसार, सामान्यपणे १० जून ला मुंबईत पोहोचणारा मान्सून १५ दिवसांच्या विलंबाने म्हणजेच २५ जून रोजी मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सूनची अखेर गती वाढली आहे आणि गेल्या ४८ तासांपासून चांगली प्रगती करत आहे. ह्याच्या मागील प्रमुख कारण उपस्थित असलेल्या बऱ्याच हवामान प्रणाली आहेत, ज्यामुळे मान्सूनच्या प्रगतीला पुन्हा सुरूवात झाल्याचे स्कायमेटने म्हटले आहे.

सध्या, कर्नाटकाच्या किनारी भागावर एक आणि मध्य प्रदेशावर एक चक्रवाती प्रणाली उपस्थित आहे. यामुळे मुंबईच्या काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, मुंबईत पावसाला सोमवारपासून वाढ होईल, हलक्या ते मध्यम पावसाची अपेक्षा करू शकतो, ज्यामुळे २५ जूनपर्यंत मुंबईत मान्सूनला सुरुवात होईल. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार २५ तारखेला मॉन्सून मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.

First Published on: June 24, 2019 1:24 PM
Exit mobile version