शिवसेना का सोडली? राणे आत्मचरित्रातून सांगणार

शिवसेना का सोडली? राणे आत्मचरित्रातून सांगणार

नारायण राणे यांचा गौप्यस्फोट

काही दिवसांपूर्वी स्वाभिमान पक्षाचे नेते नितेश राणे यांनी आपले वडील आत्मचरित्र लिहित असल्याचे ट्विटरवर सांगितले होते. यासोबतच ‘अब आयेगा मजा, सबका हिसाब होगा’, असेदेखील लिहिले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले होते. आता पुन्हा आत्मचरित्राचा विषय चर्चेत आला आहे. कारण खासदार नारायण राणे यांनी स्वत: एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या गोष्टीला दुजोरा दिला आहे. आपण आत्मचरित्र लिहित असून या आत्मचरित्रातून शिवसेना सोडण्यामागचे कारण उलगडणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नारायण राणे यांनी १९७२ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता. त्या काळात ते बाळासाहेब ठाकरेंच्या जवळच्या कार्यकर्त्यांपैकी एक होते. शिवसेनेतून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. १९९९ मध्ये त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद देखील भूषवले. २००५ मध्ये शिवसेनेला रामराम ठोकला आणि काँग्रेस पक्षात प्रवेश केला. परंतु, त्यांनी शिवसेना पक्ष का सोडला? हा मोठा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर आता त्यांच्या आत्मचरित्रातून उलगडणार आहे.

२०१७ मध्ये राणे यांनी काँग्रेस पक्ष देखील सोडला आणि एनडीएमध्ये समाविष्ट झाले. त्यांचा हा सर्व प्रवास त्यांनी आपल्या आत्मचरित्रात मांडला असल्याचे नारायण राणे यांनी म्हटले आहे. दरम्यान मुलाखतीत राणे यांनी आपले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी काहीही वैयक्तीक मतभेद नाही. त्यांच्या सोबत असलेले मतभेद वैचारिक असून उद्धव ठाकरे यांनी लोकांना कसा त्रास दिला ते आपण आपल्या आत्मचरित्रात लिहिले असल्याचे म्हटले आहे.

First Published on: May 4, 2019 3:50 PM
Exit mobile version