मुंबईसह कोकणातही युतीचाच बोलबाला!

मुंबईसह कोकणातही युतीचाच बोलबाला!

मुंबईतील लोकसभा निवडणूकीसाठी २१ हजार कर्मचारी, अधिकारी सज्ज - संपत डावखर

लोकसभा निवडणुकीच्या आज जाहीर होत असलेल्या निकालाच्या पहिल्या टप्प्यात मुंबईसह कोकणात भाजप-शिवसेनेने आघाडी घेतल्याचं स्पष्ट दिसत आहे. युतीच्या नेत्यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार गतवेळचा ४२ चा आकडा युतीला गाठता येणं अवघड असलं तरी एकूणच राजकीय स्थितीत युती बर्‍यापैकी पल्ला गाठत असल्याचं चित्र आहे. मुंबईतील सगळ्याच सहा जागांवर युतीचे सगळ्याच उमेदवारांनी चांगली आघाडी घेतली आहे. मुंबईतील सर्वात चर्चेत असलेल्या उत्तर मुंबई मतदारसंघात भाजपचे गोपाळ शेट्टी यांनी काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर यांच्यावर पहिल्या फेरीत सुमारे एक लाख मतांची मोठी आघाडी घेतली आहे. मतमोजणीवेळी ईव्हीएमबाबत मातोंडकर यांनी तक्रार केली. ईव्हीएमवरील स्वाक्षर्‍या आणि प्रत्यक्ष नोंदल्या गेलेल्या स्वाक्षर्‍या यातील फरक मातोंडकर यांनी तक्रारीतून केली.

दक्षिण मुंबईतून शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी काँग्रेसचे उमेदवार आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्यावर मोठी आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरीत सावंत यांना ६८८४५ तर देवरा यांना ३९६७१ मते पडली. दक्षिण मध्य मुंबईतूनही शिवसेनेचे राहुल शेवाळे हे पुढे आहेत. त्यांनी पहिल्या फेरीत काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांच्यावर जवळपास २० हजार मतांची आघाडी घेतली. उत्तर पश्चिम मुंबईत सेनेचे गजानन किर्तीकर यांनी काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांच्यावर जवळपास २१ हजार मतांची आघाडी घेतली आहे. उत्तर मध्य मुंबईत भाजपचे मनोज कोटक यांनी दुसर्‍या फेरीत १ लाख ६३ हजार मते घेतली. राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील यांना १ लाख १३ हाजर मतं मिळाली होती. या दोघांमधला फरक जवळपास ४० हजार मतांचा होता. उत्तर मध्य मुंबईत भाजपच्या पुनम महाजन यांनी काँग्रेसच्या प्रिया दत्त यांच्याहून २२ हजार मतांची आघाडी घेतली होती.

First Published on: May 23, 2019 1:44 PM
Exit mobile version