घरमहाराष्ट्रमहाराष्ट्रात युतीची जोरदार मुसंडी! ४२ जागांवरती आघाडी

महाराष्ट्रात युतीची जोरदार मुसंडी! ४२ जागांवरती आघाडी

Subscribe

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना युतीला मागच्या प्रमाणे मोठे यश मिळणार नाही, असे चित्र दिसत होते.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना युतीला मागच्या प्रमाणे मोठे यश मिळणार नाही, असे चित्र दिसत होते. एक्झिट पोलमध्येही ३० जागांच्या आसपास युतीला यश मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात होता, पण गुरुवारी निकाल जाहीर होत असताना युतीने ४८ पैकी ४४ जागांवर आघाडी घेतली आहे. २०१४ मध्ये युतीने ४८ पैकी ४२ जागा जिंकल्या होत्या. दुष्काळ, आश्वासनांची न झालेली पूर्ती, राज ठाकरे यांनी सरकार विरोधात उभे केलेले वातावरण पाहता युतीला यावेळी मोठे यश मिळणार नाही, असे बोलले जात होते. पण मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून दुपारपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पिछाडीवर पडलेले दिसत होते.


नवनीत राणा विरुद्ध अडसूळ ‘कट टू कट’ फाईट!

- Advertisement -

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राजीव सातव हे मागच्या वेळेस जिंकून आले होते. यावेळी मात्र नांदेमधून चव्हाण पिछाडीवर पडले आहेत. राष्ट्रवादीने मागच्या वेळेस ६ जागा जिंकल्या होत्या. मात्र आताचा ट्रेंड पाहता फक्त ३ जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार आगादीवर आहेत. सुप्रिया सुळे, उदयनराजे भोसले आणि अमोल कोल्हे या तिघांना आघाडी मिळवली आहे. मुंबई, कोकणसह, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या सगळ्या भागांमध्ये युतीच्या उमदेवारांनी आघाडी घेतली आहे.


पंकजा मुंडेना येतेय वडिलांची आठवण; लहानपणीचा ‘तो’ फोटो केला पोस्ट

- Advertisement -

युतीसाठी धक्कादायक निकाल म्हणजे औरंगाबादमधून पाच वेळा खासदार झालेले शिवसेनेचे चंद्रकांत खैरे पिछाडीवर पडले आहेत. तर काँग्रेस आघाडीसाठी अनपेक्षित धक्का म्हणजे हातकंणगलेमधून स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे राजू शेट्टी पिछाडीवर पडले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -