अंधेरी पूल दुर्घटना- अस्मिता काटकर यांची मृत्यूशी झुंज सुरूच

अंधेरी पूल दुर्घटना- अस्मिता काटकर यांची मृत्यूशी झुंज सुरूच

गोखले पूल दुर्घटनेत जखमी झालेल्या- अस्मिता काटकर

अंधेरीतील गोखले पूल दूर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या अस्मिता काटकर यांची मृत्यूशी झुंज सुरूच आहे. आपल्या मुलाला शाळेत सोडायला गेलेल्या अस्मिता काटकर अंधेरी पूल दूर्घटनेत पूलासह खाली कोसळल्या होत्या. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या संपूर्ण शरीरावर गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यामुळे प्रयत्नांची पराकाष्टा करत कूपर रुग्णालयातील डॉक्टर अस्मिता यांना वाचवण्याचा अतोनात प्रयत्न करत आहेत. मंगळवारी घटना घडल्यानंतर अस्मिता यांना तत्काळ कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर लगेचच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण, मोठ्या प्रमाणात मेंदूतून रक्तस्त्राव झाल्याकारणाने शस्त्रक्रिया करायची तरी कशी असा प्रश्न डॉक्टरांसमोर होता. आतापर्यंत डॉक्टरांनी त्यांच्या डाव्या हातावरील त्वचेचं ऑपरेशन केलं आहे. पण, डॉक्टरांना त्यांचा डावा हात कापून टाकावा लागेल अशी भीती व्यक्त केली आहे. कारण, त्यांच्या डाव्याला हाताला या घटनेत प्रचंड जखमा झाल्या आहेत, असं कूपर रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश सुखदेवे यांनी स्पष्ट केलं आहे.

“दिवसेंदिवस अस्मिताची प्रकृती बिघडत चालली आहे. शिवाय, काहीच सुधारणा होत नाही आहे. शिवाय आम्हांला तिचा हात कापून टाकावा लागतो का याचीही भीती आहे. तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तिचा हात बरा व्हावा यासाठी १० हजारांचं अॅन्टी गॅग्रींन इंजेक्शनही डॉक्टरांनी घेण्याचा सल्ला दिला आहे. जर तिचा हात वाचवायचा असेल तर इंन्फेक्शन पसरु नये यासाठी आम्हाला तिचा कापावा लागू शकतो. ”
डॉ. राजेश सुखदेवे, वैद्यकीय अधीक्षक, कूपर रुग्णालय

रेल्वेकडूनही या घटनेतील जखमींना १ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे, शिवाय, शस्त्रक्रियेला लागणारा खर्च हॉस्पिटलला परवडणारा नसेल तर तो रेल्वेकडून देण्यात येणार आहे. कोणत्याही नातेवाईंकांकडून खर्च घेतला जाणार नाही, असं ही डॉ. सुखदेवे यांनी स्पष्ट केलं आहे.

अस्मिता काटकरसह कूपर रुग्णालयात दाखल असलेले गिरीधार सिंग यांचीही प्रकृती गंभीर आहे. त्यांच्या ही प्रकृतीत काहीच सुधारणा झालेली नाही. तसंच नानावटी रुग्णालयात दाखल असलेले मनोज मेहता यांच्या डोक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं नानावटी रुग्णालय प्रशासनातर्फे सांगण्यात आलं आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

First Published on: July 5, 2018 10:36 PM
Exit mobile version