आता ड्रायव्हर आणि कंडक्टर होऊ शकतात ‘क्लर्क’

आता ड्रायव्हर आणि कंडक्टर होऊ शकतात ‘क्लर्क’

परिवहनमंत्री दिवाकर रावते

खुशखबर! एसटी महामंडळातील ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना ‘क्लर्क’ पदावर पदोन्नती मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी लिपिक- टंकलेखक संवर्गामध्ये २५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी आज केली आहे. त्यामुळे महामंडळातील पदवीधर आणि पद्व्युत्तर कर्मचाऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी चालून आली आहे.

वाचा- रिक्षाचालकांनो उद्धट वर्तन कराला तर खबरदार – दिवाकर रावते

यांना मिळणार क्लर्क बनण्याची संधी

कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी लिपिक-टंकलेखक संवर्गामध्ये २५ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. याचा फायदा चालक, वाहक, सहाय्यक, शिपाई, नाईक, हवालदार, उद्वाहन चालक, मजदूर, परिचरर, खासनामा, अतिथ्यालय परिचर, सफाईगार, सुरक्षारक्षक, खलाशी, सहाय्यक माळी, माळी व स्वच्छक या पदांवरील कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. नोकरीला प्राधान्य देणाऱ्या तरुणांनी शिक्षणाचा विचार न करता त्यांच्या शिक्षणापेक्षा कमी पदाच्या नोकऱ्या स्विकारल्या.त्यामुळे ते वाहक आणि चालक पदावरच राहिले.अशांना संधीची गरज असून त्यासाठीच हा निर्णय घेतल्याचे देखील रावते यांनी सांगितले.

हे माहित आहे का?- एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना मोफत प्रवासाचा पास दिवाकर रावते यांची घोषणा

२५ टक्के आरक्षण

राज्यात वरील पदांवर काम करणारे १ लाख कर्मचारी आहेत. त्यापैकी शैक्षणिक अर्हता पूर्ण करणारे लिपिक- टंकलेखक पदासाठी पात्र ठरतील. त्यासाठी २५ टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांचे शिक्षण वाया न जाता त्यांना त्यांच्या शिक्षणास योग्य अशी पदोन्नतीची संधी मिळेल, असे रावते यांनी सांगितले.

First Published on: December 6, 2018 9:37 PM
Exit mobile version