ट्रेनमधून स्टंट करणाऱ्या हुल्लडबाजांना अटक; पाहा व्हिडिओ

ट्रेनमधून स्टंट करणाऱ्या हुल्लडबाजांना अटक; पाहा व्हिडिओ

स्टंट करणारी टवाळखोर मुल

गेल्याच आठवड्यात मुंबईच्या लोकलमध्ये स्टंट करणाऱ्या एका तरुणामुळे गँगमनला आपला जीव गमवावा लागला होता. या टवाळखोरांच्या हुल्लडबाजीचा अतिरेक दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. हार्बर रेल्वेवर हुल्लडबाजी करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओतील चारही टवाळखोरांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. मुंबईच्या लोकलमध्ये स्टंट करणाऱ्या या तरुणांना बुधवारी मध्यरात्री वडाळा लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कसे सापडले हुल्लडबाज

हार्बर मार्गावरील जीटीबी रेल्वे स्थानक आणि चुनाभट्टी स्थानकादरम्यानच्या प्रवासातील जीवघेण्या स्टंटबाजीचा व्हिडिओ समोर आला होता. हा व्हिडिओ स्टंट करणाऱ्यांपैकी एकाने आपल्या कॅमेरात शूट केला. यामध्ये चौघांपैकी एकजण धावत्या ट्रेनच्या छतावर चढताना दिसत होता. तर, इतर तरुण दरवाजा आणि खिडकीला लटकत असल्याचे या व्हिडिओत पाहायला मिळाले. यासोबत या मुलांपैकी एकाने प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या एका प्रवाशाचा मोबाईल हिसकावल्याचेही या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या चौघांना ताब्यात घेतले आहे.

 

हुल्लडबाजांना जेरबंद करण्यात यश

रविवारी हार्बर मार्गावरील ट्रेनमध्ये लटकून स्टंट करणाऱ्या चार मुलांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी या तरुणांना शोधण्याचे मोहीम हाती घेतली. अखरे बुधवारी मध्यरात्री या चार मुलांना पकडण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे.

First Published on: August 2, 2018 1:09 PM
Exit mobile version