पंचतारांकित रेडिसन ब्लू हॉटेलचे मालक अमित जैन यांची आत्महत्या, घरात आढळला मृतदेह

पंचतारांकित रेडिसन ब्लू हॉटेलचे मालक अमित जैन यांची आत्महत्या, घरात आढळला मृतदेह

दिल्लीतील रेडिसन ब्ल्यू हॉटेलचे मालक अमित जैन यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे आत्महत्येनंतर अमित जैन यांच्या राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे. रेडिसन ब्लू हॉटेलचे मालक अमित जैन यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलिसांनी अधिक तपास सुरुवात केली. पोलिसांनी अमित जैन यांचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवल्याचे समजते. (Radisson Blu Hotel Owner Amit Jain Commits Suicide At Delhi Home)

मिळालेल्या माहितीनुसार, अमित जैन यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. अमित जैन यांचा मुलगा घरी गेला असता त्याला वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळले. त्यांनंतर आमित जैन यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

अमित जैन यांच्यावर बँकेच्या कर्जाचा भार असल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. गाजियाबादमधील कौशांबी येथील स्थित ब्लू हॉटेलचे मालक अमित जैन यांचा शनिवारी त्यांच्या निवासस्थानी मृतदेह आढळला. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित जैन यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. मृतदेहाजवळ कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. पोलिसांना कंट्रोल रुमच्या माध्यमातून आत्महत्येची माहिती मिळाली होती.

अमित जैन नोएडामधील आपल्या घरी नाश्ता केल्यानंतर गावातील घरी आले होते. अमित जैन संपूर्ण कुटुंबाला नोएडाला नेणार होते. रस्त्यात त्यांनी आपल्या भावाला गाजियाबादमधील कार्यालयात सोडले. त्यानंतर आपण एकटेच पुढील प्रवास करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. याप्रकरणी पोलिसांनी घातपाताची कोणतीही शक्यता फेटाळली आहे. याप्रकरणी सध्या तपास सुरु आहे.


हेही वाचा – राज्यपालांना तीन वर्षांनंतरही महाराष्ट्र कळत नसेल तर…; अजित पवार संतापले

First Published on: November 20, 2022 2:31 PM
Exit mobile version