असे लिहिणे ही एक प्रवृत्ती नव्हे मानसिक विकृती – राज ठाकरे

असे लिहिणे  ही एक प्रवृत्ती नव्हे मानसिक विकृती  – राज ठाकरे

Raj Thackeray has protested against Ketki Chitale's statement

केतकी चितळेने फेसबुक पोस्ट करत खासदार शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवरील टीका केली आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस सह राज्यातील अनेक नेत्यांनी केतकी चितळेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आत यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्र ट्विट केले आहे. या पत्रात केतकी चितळेचा तीव्र शब्दात निषध व्यक्त करत असे लिहिणे ही एक प्रवृत्ती नव्हे मानसिक विकृती आहे. तिला वेळीच आवर घालायला पाहिजे, असे म्हटले आहे.

या पत्रात कोणीतरी केतकी चितळे नामक व्यक्तीने खालच्या पातळीवर जाऊन घारणेरड्या शब्दात काहीतरी श्लोकासारखे लिहून फेसबुकवर पोस्ट प्रकाशित केलेचे आमच्या निदर्शनास आले आहे. खाली काहीतरी भावे वगैरे असे नाव टाकले आहे. हे जे लिखाण आहे त्याला महाराष्ट्राच्या संस्कृतीत जागा नाही. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषध करतो, असे  म्हटले आहे.

 

पुढे पत्रात महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच वर्ष कार्यरत असलेल्या शरद पवार यांच्या विरूध्द तिने किंवा भावेने लिहिणे साफ गैर आहे. विचारांचा मुंकाबला विचारांनी कारायचा असतो. आमचे त्यांच्याबरोबर मतभेद जरूर आहेत आणि राहतील, परंतु अशा घाणेरड्या पातळीवर येणे साफ चूक आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असे लिहिणे ही एक प्रवृत्ती नव्हे मानसिक विकृती आहे. तिला वेळीच आवर घालायला पाहिजे, असेही म्हटले आहे.

पोस्ट लिहिणाऱ्या व्यक्ती ह्या खरंच आहेत की नवा वाद उकरून काढण्यासाठी कोणाची तरी उठाठेव सुरू आहे, हे तापसणे गरजेचे आहे. अशा चार-दोन विकृत टाळक्यांमुळे समाजा- समाजामध्ये तेढ निर्माण होते, समाज दुभंगतो. द्वेषाची पातळी किती खालपर्यंत आली आहे हे राज्यकर्त्यांनाही समजले असेलच. हे सगळे महाराष्ट्रात वेळीच आवरणे गरजेचे आहे. कारण महाराष्ट्राची ओळख वेगळी आहे. म्हणूनचे राज्यसरकारने ह्याचा नीट छडा लावून ह्या गोष्टींचा ताबडतोब बंदोबस्त करावा, असे राज ठाकरे यांनी या पत्रात म्हटले आहे.

First Published on: May 14, 2022 4:56 PM
Exit mobile version