“काल बोललो, त्याचा आज परिणाम दिसला…, बोलघेवडे कोण हे दिसतंय” – राज ठाकरे

“काल बोललो, त्याचा आज परिणाम दिसला…, बोलघेवडे कोण हे दिसतंय” – राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल गुढीपाडव्यानिमित्त घेतलेल्या सभेत माहिमच्या दर्गाहचा मुद्दा मांडला. यावरून त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला इशाराही दिला. त्यानंतर लगेचच आज कारवाई सुद्धा करण्यात आली. मुंबई महापालिका, जिल्हाधिकारी आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने खाडीतील मजारच्या जागेवरील हिरवा झेंडा हटवला आणि अतिक्रमण हटवण्याला सुरुवात केली. तसंच अनधिकृत मजारवर बुलडोझर फिरवण्यात आला आहे. यावर आता राज ठाकरेंनी आपली मोठी प्रतिक्रिया दिलीय. “काल बोललो, त्याचा आज परिणाम दिसला..बोलघेवडे कोण हे दिसतंय”, असं राज ठाकरे यांनी म्ह्टलंय.

मुंबईतील सायन रूग्णलयाकडून वसंतोत्सव साजरा करण्यात येत आहे. या उत्सवात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मुखाखत घेण्यात आली. या मुलाखतीत संवाद साधताना राज ठाकरेंनी आजोबा बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या फोटोबायोग्राफी करतानाची आठवण सांगितली. बाळासाहेबांच्या फोटोबायोग्राफीच्या मुखपृष्ठासाठी फोटो खूप विचार करून काढला असल्यातं राज ठाकरेंनी सांगितलं. फोटो निवडण्यासाठी किती बारकाईने विचार केला हे देखील राज ठाकरेंनी सांगितलं.

यावेळी राज ठाकरेंना महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सवाल करण्यात आले. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा वारसा चालवणारे तीन राजकीय पक्ष आहेत. कोणता झेंडा घेऊ हाती अशी परिस्थिती सध्या मराठी माणसाची झाली आहे. मग यातून मराठी माणूस पेचात पडलाय का? असा प्रश्न यावेळी राज ठाकरेंना विचारण्यात आला. लग्न करायचंय असं प्रत्येकजण म्हणतो. पण लग्न करतोय कोण? हे महत्त्वाचं आहे, असं म्हणत राज ठाकरेंनी कोड्यात उत्तर दिलं. यावर आणखी पुढे बोलताना राज ठाकरेंनी आज माहिम इथल्या अनधिकृत मजारवर आज सकाळपासून सुरू झालेल्या कारवाईवरून मोठं वक्तव्य केलं. “आम्ही फक्त बोलत नाही, काल बोललो त्याचा आज परिणाम दिसला, फक्त बोलघेवडे कोण हे समजतंय. कोण ही गोष्ट करतंय, कोण करत नाही आणि कोण नुसतं बोलतंय हे सुद्धा समजत आहे. कोणाच्या शब्दाला वजन आहे हे जनता पाहतेय.” अशा शब्दात राज ठाकरेंनी आपली प्रतिक्रिया दिलीय.

राज ठाकरेंनी केलेल्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. राज ठाकरेंच्या या व्यक्तव्याचा नेमका रोख कोणाकडे होता याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

First Published on: March 23, 2023 12:40 PM
Exit mobile version