नौदल अधिकाऱ्याची मुंबईमध्ये आत्महत्या!

नौदल अधिकाऱ्याची मुंबईमध्ये आत्महत्या!

प्रातिनिधिक फोटो

गुरुवारी (काल) सकाळी ११ – ११:३० च्या सुमारास मुंबईत एका नौदलाच्या अधिकाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. केसर सिंग असं या ५६ वर्षीय नौदल अधिकाऱ्याचं नाव होतं. मूळचे मंडलाचे असलेले केसर सिंघ नवी मुंबईमधील ट्राँबे परिसरात वास्तव्याला आले होते. गुरुवारी सकाळी त्यांनी आपल्या परावानाधारी रिव्हॉल्वरने स्वत:वर गोळी झाडून घेतली. सिंग हे निवृत्त सेवादल अधिकारी होते. सध्या डिफेन्स सिक्युरिटी क्रॉप्स (DSC)चे गार्ड म्हणून काम पाहत असलेले सिंघ, यांची नुकतीच नेव्हल आर्मामेंट डेपो (NAD) मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, याप्रकरणातील मुख्य तपास अधिकारी एच. बानेकर यांनी सांगितल्यानुसार, अद्याप सिंग यांची कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. पोलीस उपायुक्त शाहाजी उमप यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंघ यांची नियुक्ती व्हल आर्मामेंट डेपोच्या ‘वॉच टॉवर’वर करण्यात आली होती. ऑन ड्युटी असतानाच त्यांनी सकाळी ११ च्या सुमारास आपल्या 7.62 एमअम रिव्हॉलव्हरने स्वत:वर गोळी झाडून घेतली.

सविस्तर घटना…

पोलीस उपायुक्त उमप यांनी सांगितले की, ‘सिंग हे लवकरच एक महिन्याच्या सुट्टीसाठी त्यांच्या गावी जाणार होते. याविषयी त्यांनी आपली पत्नी आणि मुलगी यांना पूर्वसूचना देखील दिली होती. गुरुवारी (काल) सिंग त्यांच्या नेहमीच्या वेळेला अर्थात ११ वाजता कामावर आले आणि त्यांनी आपले कामही सुरु केले. मात्र, साधारण १२ वाजण्याच्या सुमारास ज्यावेळी सुपरवाईजर वॉचटॉवरच्या कामाची पाहणी करण्यासाठी गेला, त्यावेळी त्याला सिंग जमिनीवर कोसळलेले आढळले.’ घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त उमप त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले आणि संपूर्ण घटनेचा सविस्तर पंचनामा केला. यावेळी मिळालेल्या पुराव्यांवरुन सिंग यांनी आत्महत्या केल्याची पोलिसांना खात्री झाली.

पोलीस पंचनाम्यानंतर सिंग यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर दुसरीकडे पोलीस घटनास्थळावरील लोकांची चौकशी करत असून, सिंग यांनी नक्की का आत्महत्या केली? याचा शोध घेत आहेत. सिंघ घरी येण्याची आतुरतेने वाट पाहत असलेल्या त्यांच्या कुटुंबियांवर या घटनेमुळे दुखा:चा डोंगर कोसळला आहे.


पाहा : पंतप्रधान मोदी बनले ‘सुपरस्टार’ …

First Published on: January 11, 2019 10:23 AM
Exit mobile version