रियाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; कोर्टाने नामंजूर केला जामिन अर्ज

रियाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; कोर्टाने नामंजूर केला जामिन अर्ज

छाया - दीपक साळवी

रिया चक्रवर्तीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तिचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला असून आता रियाला २२ सप्टेंबरपर्यंत कोठडीत रहावे लागणार आहे. NCB ने आज, मंगळवारी अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातली मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्तीला ड्रग्ज सेवन आणि इतर आरोपाखाली अटक केली. अंमली पदार्थ विरोधी विभागाने ही कारवाई केली त्यानंतर तिला न्यायालयात हजर करण्यात आले. आज दुपारी रियाला ताब्यात घेण्यात आले असून सायंकाळी तिची मेडिकल चाचणी करण्यात आली. तसेच साडेसातच्या सुमारास रियाला कोर्टासमोर हजर करण्यात आले.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने आज रियाला अटक केली आहे. या आधी रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांना एनसीबीने चौकशीसाठी ताब्यात घेऊन अटक करण्यात आली होती. त्यांना ९ सप्टेंबरपर्यंत एनसीबी कस्टडी सुनावण्यात आली आहे. याचसंदर्भात गेले ३ दिवस रियाची कसून चौकशी सुरू होती. अखेर सबळ पुरावे हाती लागल्यावरच NCB ने रियाला अटक करण्यात आली.

हेही वाचा –

नाशकातील खासगी हॉस्पिटलचा टर्नओव्हर ३९ दिवसांत ४६ कोटी

First Published on: September 8, 2020 11:26 PM
Exit mobile version