मोदींनी लसीवर विश्वास दाखवल्याबद्दल स्वागत – संजय राऊत

मोदींनी लसीवर विश्वास दाखवल्याबद्दल स्वागत – संजय राऊत

ह्रदयनाथ मंगेशकरांना आकाशवाणीतून काढलं हे खोटं, संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लस घेतली, राष्ट्रपती घेतील, केंद्रीय मंत्री घेतील आणि सगळ्या जनतेला लस मिळाली पाहिजे. प्रधानमंत्र्यांनी लस घेतल्यामुळे देशातील जनतेला आत्मविश्वास वाढेल. मोदींनी लस घेतल्याबद्दल त्यांचे स्वागत करतो. मोदींनी लसीवस विश्वास दाखवल्याबद्दल हे फार महत्त्वाचे आणि कौतुकास्पद असल्याचे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु आहे. आतापर्यंत लाखो कोरोना योद्ध्यांनी लस घेतली आहे. यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लस घेतली आहे. मोदींनी भारत बायोटेकची कोवॅक्सीन लस घेतली आहे.

मोदी सरळमार्गे नेते

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लस केरळ आणि तमिळनाडूच्या परिचारिकांकडून टोचून घेतली. यावेळी मोदींनी आसामी गमछा टाकला होता यामुळे यामागे राजकीय समीकरणे असल्याचे बोलले जात आहे. परंतु याकडे राष्ट्रीय एकात्मतेने पाहायले पाहिजे. काँग्रेसच्या मार्गानेच मोदी चालले आहे. यापूर्वी काँग्रेसचे नेतेही असेच सर्व राज्यातील लोक आपल्या भोवती असतील असे बघायचे.

अधिवेशनाच्या वेळेचा योग्य वापर करावा

विरोधकांनी अधिवेशानात सरकारला घेरण्यापेक्षा चर्चा करा ते जनतेसाठी फायद्याचे आहे. विरोधकांना चर्चा करण्यास आवडते त्यांना आता चर्चेला संधी आहे. तसेच चर्चा करत राहिले पाहिजे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच सरकारमधील सर्व नेते विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देतील.

राज धर्माचे राज्यपालांनी पालन करावे

राज्याच्या राज्यपालांवर जास्त जबाबदारी आहे. ते राज्याचे घटनेचे घटनात्मक प्रमुख आहेत. राज्यपालांकडे राज्यसरकारचे अनेक विषय पेंडिंग आहेत. ते राज्यपालांनी हळूहळू मोकळे केले पाहिजेत. त्यांच्यकडील फाईलींच्या गाठी सोडल्या पाहिजेत. असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

First Published on: March 1, 2021 9:53 AM
Exit mobile version