शरद पवार जागे व्हा; चक्का जाम आंदोलनात भाजप महिला मोर्चाच्या घोषणा

शरद पवार जागे व्हा; चक्का जाम आंदोलनात भाजप महिला मोर्चाच्या घोषणा

शरद पवार जागे व्हा; चक्का जाम आंदोलनात भाजप महिला मोर्चाच्या घोषणा

पूजा चव्हाणच्या आत्महत्येला तब्बल १८ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. परंतु पूजाने आत्महत्या केली की हत्या झाली याबाबत अद्याप कोणतीही माहिती आली नाही. त्यामुळे विरोधी पक्ष भाजपने सरकारची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. पूजा चव्हाण प्रकरणतील कथित ऑडिओ क्लिप्समुळे या प्रकरणात अडकलेले वनमंत्री संजय राठोड यांच्यावरही राज्य सरकारकडून कारवाई करण्यात आली नाही. वनमंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई व्हावी, पूजाच्या कूटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी भारतीय प्रदेश महिला मोर्चा तर्फे पूजा चव्हाणला न्याय मिळावा या मागणीसाठी भारतीय प्रदेश महिला मोर्चा तर्फे राज्य सरकार विरोधात मुंबई पुणे महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले आहे. या मोर्चात शरद पवार जागे व्हा अशा घोषणा देत मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक अडवण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला आहे.

महाराष्ट्रातील लेकीवर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी भाजपा महिला मोर्चातर्फे राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. पूजाच्या कुटुंबियांना न्याय मिळालाचं पाहिजे. गंभीर आरोप असणाऱ्या वादग्रस्त मंत्र्यांना सरकारने पाठीशी घालून नये आणि त्यांचा राजीनामा घ्यावा अशा घोषणा या मोर्चामध्ये देण्यात आल्या आहेत. तसेच या मोर्चामध्ये शरद पवार जागे व्हा अशा घोषणा देण्या आल्या आहेत. पूजा प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांच्यावर राज्य सरकारने अद्यापही कारवाई केली नाही आहे. संजय राठोड यांची पदावरुन हकालपट्टी करावी आणि जर कारवाईत निर्दोष मुक्त झाले तर त्यांना पुन्हा मंत्रीमंडळात घ्यावे असे भाजप महिला मोर्चाची मागणी आहे.

संजय राठोड प्रकरणावर शरद पवारही नाराज असल्याचे समजते आहे. वनमंत्री संजय राठोड यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे मत राष्ट्रवादीकडून व्यक्त करण्यात आले आहे. तशीच भूमिका भाजपचीही आहे. पूजा प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांच्यावर अद्याप कारवाई न केल्यामुळे भाजप महिला मोर्चाने आक्रमक भूमिका घेत राज्यभर चक्काजाम आंदोलन केले आहे. या मोर्चादरम्यान मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक अडवण्याचा प्रयत्न महिला मोर्चाने घेतला आहे. परंतु पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत वाहतुक सुरळीत केली आहे.


हेही वाचा : तर विधान भवनात तोंड उघडू देणार नाही, चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा


 

First Published on: February 27, 2021 4:43 PM
Exit mobile version