‘या’ कारणामुळे शिल्पा शेट्टी आणि कुटुंबीयांना खेचले कोर्टात

‘या’ कारणामुळे शिल्पा शेट्टी आणि कुटुंबीयांना खेचले कोर्टात

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आपल्या आई आणि बहिणी बरोबर

आपल्या फिटनेसने सर्वांना आकर्षित करणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टीला कोर्टाकडून बोलावणं आलं आहे. शिल्पा शेट्टीच्या दिवंगत वडिलांनी जीवंत असताना २१ लाखाचे कर्ज घेतले होते. २०१७ साली हे पैसे परत करायचे होते. पैसे परत न केल्यामुळे न्यायायाने शिल्पा शेट्टी तिची बहिण शमिता शेट्टी आणि तिची आई सुनंदा शेट्टी यांना नोटीस बजावली आहे. शिल्पा शेट्टी विरोधात एका ऑटोमोबाईल कंपनीच्या मालकाने ही तक्रार केली आहे. सध्या हे प्रकरण न्यायालयात असून शिल्पा किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी यावर कोणतेही अधिकृत भाष्य केलेले नाही. मात्र हे प्रकणी आता न्यायालयात सुरु राहणार असल्याचा अंदाज वकीलांकडून वर्तवला जात आहे.

काय आहे प्रकरण  

शिल्पाचे वडिल सुरेंद्र यांनी २०१५ मध्ये २१ लाख रुपयांचे कर्ज काढले होते. परहाद अमरा याच्याकडून हे कर्ज घेण्यात आले होते. या कर्जावर १८ टक्के व्याज आकारण्यात येण्याचे ठरले होते. परहाद यांची ऑटोमोबाईल्स ची कंपनी आहे. परहाद आणि सुरेंद्र यांनी एक कंपनी सुरु केली होती ज्यामध्ये शिल्पा आणि तिची आई पार्टनर्स होते. शिल्पाच्या वडिलांना हे लोन टप्प्या टप्प्याने मिळणार होते. कर्ज फेडण्यापूर्वीच सुरेंद्र यांचे ११ ऑक्टोबर २०१६ रोजी निधन झाले होते. यानंतर कर्जाची मागणी शिल्पा आणि तिच्या आईकडे करण्यात आली होती. मात्र कर्जावरून वाद झाला आणि हे प्रकरण न्यायालयात पोहोचले.

जुहू पोलिसांकडे केली तक्रार 

पैसे थकवण्याची तक्रार जुहू पोलिसांकडे करण्यात आली होती. यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. २४ एप्रिल २०१७ रोजी शेट्टी कुटुंबीयांना पहिली कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र या नोटीसला प्रतिसाद दिल्या गेले नाही. २६ ऑक्टोंबर २०१७ रोजी अंधेरी कोर्टाने १५६ कलमांअतर्गत गुन्हा दाखल केला.

“न्यायालयात खटला सुरु असताना शिल्पा शेट्टी आणि तिचे कुटुंबीय उपस्थित नव्हते. यामुळे जुहू पोलिसांना चौकशीचे आदेश न्यायालयाने दिले आहे. या खटल्याची पुढील सुनावणी २९ जानेवारी रोजी होणार आहे.”- परहाद अमराचे वकील,  युसुफ इकबाल

 

First Published on: January 24, 2019 1:01 PM
Exit mobile version