पाडवा स्पेशल : गुढीपाडव्यानिमित्त मुंबईत ‘शोभायात्रा’

पाडवा स्पेशल : गुढीपाडव्यानिमित्त मुंबईत ‘शोभायात्रा’

पाडवा स्पेशल : गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा

उत्तर – चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा होणारा सण म्हणजे गुढीपाडवा. साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. गुडीपाडव्याला मराठी संस्कृती दिमाखात मिरवण्याची आपली शतकांची परंपरा आहे. पारंपारिक वेशभूषा, चित्ररथ, सामाजिक संदेश, मातीतील कसरती यांची ओळख करुन देणाऱ्या शोभायात्रांमध्ये सहभागी होऊन तरुणाई आपली नाळ या परंपरांशी जोडून ठेवत आहे. या शोभायात्रांनी संपूर्ण मुंबई दुमदुमणार आहे.

गिरगाव

गिरगाव यात्रेचा प्रारंभ सकाळी ८ वाजता फडके श्री गणेश मंदिरापासून होणार आहे.
२० फूट उंच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मूर्तीच्या हातात यात्रेची मुख्य गुढी.
महिला आणि युवतींचे अथर्वशीर्ष पठण.
श्रीरामासमोर रामकथा गायन करणारे लव-कुश यांच्यावरील देखावा यात्रेचे मुख्य आकर्षण.
संभाजी महाराज यांच्यावरील देखावा.
रांगोळ्यांच्या पायघड्या, दुचाकीस्वार महिलांचे आदिशक्ती पथक, युवकांचे युवाशक्ती पथक यांचा समावेश.

भायखळा

सकाळी ८ वाजता भायखळा स्टेशन पश्चिम ते आर्थर रोड नाक्यापर्यंत शोभायात्रा.
पु.ल.देशपांडे यांच्या साहित्य संपदेवर आधारित चित्ररथ हे मुख्य आकर्षण.
शोभायात्रेचे पाचवे वर्ष.

दादर

दादर पूर्व येथील शिंदेवाडी पटांगणातून सकाळी ८ वाजता शोभायात्रेला सुरुवात.
प्रमुख उपस्थिती – सैराट फेम आर्ची.

भांडुप पूर्व

गणेश मंदिर येथून शिंदेवाडी पटांगणातून सकाळी ८ वाजता शोभायात्रेला सुरुवात
पारंपारिक वेशभूषा, ढोलताशांचा गजर.
९० फूट रस्ता, गोल्डन पॅलेस येथे समारंभ.

गिरणगाव

परळ येथील स्वामी समर्थ मठातून सकाळी ७ वाजता शोभायात्रेला सुरुवात, समारोप. चिंचपोकळी दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मुक्ता जयहिंद.

सिनेमागृहाजवळ

लालबाग – परळ गिरणगावच्या शोभायात्रेत स्त्री शक्तीचा जागर.
शोभायात्रेत भारतमातेच्या पालखीचा मान महिलांना.
परळमधील नाना पालकर रुग्ण सेवा समिती या संस्थेस गिरणगावभूषण पुरस्कार.
शोभायात्रेत महिलांचे दांडपट्टा सादरीकरण, लेझीम पथकाचे सादरीकरण, कथक. सादरीकरण, महिला बाइकस्वार यांचा समावेश.

पालखी नृत्याचे आकर्षण

शिवरायांवरील चित्ररथ, १५ फूट उंचीची भारतमातेची प्रतिमा, देवभूमी महाराष्ट्र संस्कृती चित्ररथ, मल्लखांब योगा आदि चित्ररथ, सामाजिक, धार्मिक, राष्ट्रभक्ती आणि दहशतवाद आदि विविध विषयांवरील चित्ररथ.

विलेपार्ले

दुपारी ४.३० वाजता पाच दिशांनी शोभायात्रांना सुरुवात, सायंकाळी ५.३० वाजता. पार्लेश्वर चौकात महास्फूर्ती यात्रा, हनुमान मार्गावरुन मार्गक्रमण.
रंगीला भारत – जोशीला भारत संकल्पना.
५७ फुटी गुढी विशेष आकर्षण.
पाकिस्तानी दहशतवादावर हवाई हल्ला आणि सर्जिकल स्ट्राइक यांचे चलच्चित्र रथ.

गोरेगाव

मानवमंदिर सोसायटी विद्यानिकेतन मार्ग, गोरेगाव पश्चिम येथून सकाळी ८ वाजता शोभायात्रेला सुरुवात.
राष्ट्रभक्तीवर आधारित चित्ररथ हे यंदाचे प्रमुख आकर्षण.

भांडुप

भांडुप पश्चिम येथील जंगल मंगल रोडवरुन सायंकाळी ६ वाजता शोभायात्रेला सुरुवात
देशभक्ती या विषयावर आधारित शोभायात्रा.
वेषभूषा आणि चित्ररथ स्पर्धा.
५१ चित्ररथ आणि यात्रांचा सहभाग अपेक्षित.

कुर्ला

सर्वेश्वर मंदिर येथून सकाळी ८ वाजता स्वागतयात्रेला सुरुवात.
कारगील विजयाला २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तसेच बालाकोट येथील हवाई दलाच्या शौर्याचे प्रतीक म्हणून नववर्ष यात्रेत शौर्याची गुढी.
कुर्ल्यातील आजी-माजी सैनिकांचा सत्कार, दुपारी १२ वाजता भारत सिनेमा कुर्ला पश्चिम येथे होणार आहे.

मुलुंड

राजे संभाजी सभागृह अरुणोदय नगर, मुलुंड पूर्व येथून सकाळी ७ वाजता शोभायेत्रेला सुरुवात.
स्वागतयात्रेत मराठमोळ्या खेळांच्या माध्यमातून संस्कृती जपण्याचा प्रयत्न.
मोबाइल गेमच्या आहारी गेलेल्या मुलांना मराठी खेळाचे महत्त्व पटवायचा प्रयत्न.
महिला लेझीम पथक, लहान मुले-मुलींचे लगोरी, आट्यापाट्या, विटीदांडू खेळांचे प्रात्यक्षिक.

First Published on: April 5, 2019 12:26 PM
Exit mobile version