नवी मुंबईत उघड्यावर कत्तल करण्यास बंदी

नवी मुंबईत उघड्यावर कत्तल करण्यास बंदी

प्राण्यांची उघड्यावर कत्तल करण्यास बंदी

उघड्यावर प्राण्यांची कत्तल करणे हा गुन्हा असताना देखील मांसाहारींची गरज भागविताना अनेक ठिकाणी उघड्यावर प्राण्यांची कत्तल केली जात असल्याचे समोर आले आहे. नवी मुंबईत सर्रास उघड्यावर शेळ्या – मेंढ्या, कोंबडी यांची कत्तल केली जाते. ही कत्तल ग्रामीण भागात मोठया प्रमाणात केली जाते. याला आळा बसावा याकरता नवी मुंबई पालिकेचे नवनियुक्त अतिरिक्त आयुक्त महावीर पेंढारी यांनी अशा मांस विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश प्रभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत.


वाचा – कत्तल करण्यासाठी केली उंटांची अवैध वाहतूक


कत्तलखाना नसल्याने उघड्यावर केली जाते कत्तल

नवी मुंबईत गेल्या २५ वर्षांत पालिकेचा कत्तखाना नसल्याने उघड्यावर प्राण्यांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जात आहे. तसेच काही मांस विक्रेत्यांनी कत्तल करण्यासाठी काही गाळे आणि रुम देखील भाड्याने घेतल्या आहेत. तर काही ठिकाणी दुकानासमोर कापडी पडदे लावून कत्तल करण्यात येते. तसेच नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे असल्याने या ठिकाणी शहरी भागापेक्षा जास्त लोकसंख्या आहे. त्यामुळे या भागात मांसाहारीची गरज भावगविताना अनेक ठिकाणी उघड्यांवर मांस विक्रेते शेळ्या, मेंढ्या आणि कोंबड्या यांची कत्तल करत असल्याचे दिसून येत आहे.


वाचा – २० हजार शार्क माशांची सेक्ससंबंधित औषध तयार करण्यासाठी कत्तल


पालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर केली जाते कत्तल

नवी मुंबईत उघड्यावर करण्यात येत असलेली कत्तल ही पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या डोळ्यासमोर बिनधास्तपणे केली जात आहे. तर काही अधिकारी मांस घेण्यासाठी आपल्या ओळखीचा उपयोग देखील करत असल्याचे समोर आले आहे. उघड्यावर प्राण्यांची कत्तल करणे हा गुन्हा असून याला आळा बसावा याकरता त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुले उघड्यावर होणाऱ्या प्राण्यांच्या कत्तलीला आता तरी पायबंद बसणार अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.


वाचा – उत्तराखंड राज्यातील कत्तलखान्यांवर बंदी


नवी मुंबईत उभारणार कत्तलखाना

नवी मुंबई पालिकेला सिडकोने काही दिवसांपूर्वी सानपाडा येथे कत्तलखान्यासाठी भूखंड अदा केला आहे. सर्व प्रकारच्या प्राण्याची कत्तल आणि उपचार करण्याची पालिकेने मागणी केल्याप्रमाणे शिरवणे येथे २२ एकर जमीन जाहीर केली आहे. या भूखंडाचे शुल्कदेखी भरण्यात आले असून आता नवी मुंबईत पालिकेचा अद्ययावत कत्तलखाना उभारणार आहे.

विक्रेत्यांनी उघड्यावर कत्तल करु नये

नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात उघड्यावर प्राण्यांची कत्तल केल्याचे दिसून येत आहे. शहराच्या आरोग्याच्या दृष्टीने ही हानीकारक असल्याने यावर कडक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे विक्रेत्यांनी उघड्यावर कत्तल करु नये.  – महावीर पेंढारी, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई पालिका

First Published on: November 28, 2018 4:08 PM
Exit mobile version